देवळीत दुचाकी अपघातात पत्रकार विलास खोपाळ यांचा मृत्यू

0

देवळीत दुचाकी अपघातात पत्रकार विलास खोपाळ यांचा मृत्यू

देवळी / प्रतिनिधी :

देवळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते वय 55 यांचे रात्री 9 वाजताच्या सुमारास सालोड पडेगाव चौफुलीजवळील दुचाकीचा अपघात झाल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले.असता त्यांना सावंगी मेघे रुग्णालयातील दाखल करण्यात आले होते.तसेच त्यांना जबर जखमी झाल्यामुळे पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.सविस्तर माहिती मिळाल्याप्रमाणे विलासराव खोपाळ यांच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे ते निमंत्रण पत्रिका वाटण्या करिता वर्धेला गेले होते आणि पत्रिका वाटून परत येताना सालोड पडेगाव चौफुलीजवळील एक महिला अचानक रस्त्यातील आल्यामुळे महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि ते खाली कोसळले त्यामुळे त्यांना जबर दुखापत झाली आणि त्या महिला सुद्धा जखमी झाली.अपघात होताच परिसरातील नागरिक या ठिकाणी जमा होऊन जखमींना सावंगी रुग्णालयातील दाखल करण्यात आले.महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे.आणि पत्रकार विलास खोपाळ यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.पुढील चौकशी सावंगी पोलिस करीत आहे विलास खोपाळ यांच्यामागे एक मुलगा एक मुलगी व पत्नी असा आप्त परिवार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!