🔥देवळी तालुक्यात अवैध रेती साठवणूक व घाटातून रेतीचे अवैध उत्खनन सुरु.
🔥महसूल व पोलीस विभागाची डोळेझाक.
🔥वाळू तस्करांना राज्यकर्त्यांचा आश्रय.
देवळी -/ देवळी तालुक्यात 11 घाटाचे लिलाव करण्यात आलेले आहे.आणि त्या घाटांमधून रेती उपसा सुरू सुद्धा झाला असून परंतु त्या 11 घाटांच्या आड मध्ये आंजी,अंदोरी, देवळी यशोदा नदी परिसर ,शिरपूर ,रोहिणी तसेच लिलाव न झालेल्या घाटांमधूनही अवैध प्रमाणात वाळू तस्कर बोट पोकलँड च्या सहाय्याने अवैध रेती उपसा करीत आहे तसेच देवळी शहरात तसेच ग्रामीण भागात वाळू तस्करांनी अवैध प्रमाणात मोठ-मोठे वाळूचे ढिगारे लावून रेती जमा करून ठेवलेली आहे.या वैध रेती साठवणी केलेल्या ढिगार्याकडे महसूल विभागाकडे लक्ष द्यायला वेळ नाही ते वेळ काढू पणा करून अवैध रेती उपसाकडे डोळे झाक करीत आहे.
या अवैध रेती व्यवसायामुळे देवळी तालुक्यामध्ये अनेक जणांच्या हत्या झालेल्या आहे. आणि एका वाळूमाफियाच्या हत्या मधील वाळू तस्कर जामिनावर सुटून आलेले आहे आणि त्यांनी परत तोच व्यवसाय करणे सुरू केले आहे. त्यामुळे अवैध रेती व्यवसायामध्ये पुन्हा गॅंगवार सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देवळी तालुक्यातील जे घाट लिलाव झाले त्या घाटांमधून यंत्राच्या सहाय्याने नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे घाट चालविणारे मनमर्जीप्रमाणे घाटामधून व आजूबाजूच्या परिसरातून रेतीचा उपसा करीत आहे . आम्ही ढिगारे लावत आहे.कारण त्यांच्या मनातून शासन कारवाईची भीती नाहीशी झालेली आहे त्यांच्यावर देवळी तालुक्यातील मोठ्या नेत्याचे हात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये त्या नेत्याची सुद्धा भागीदारी असल्याची सांगितल्या जात आहे.
आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर एका शासकीय अधिकाऱ्याने सांगितले आहे की आम्ही राजनैतिक दबावामुळे वाळू तस्करांवर कारवाई करू शकत नाही आणि लिलाव झालेल्या घाटांमधून नियमाप्रमाणे किती ब्रास रेती काढण्यात आली आहे याची सुद्धा चौकशी करण्यासाठी शासकीय अधिकारी त्या घाटावर राजनीतिक दबावामुळे जाऊ शकत नाही अशी अवस्था सध्या देवळी तालुक्यातील रेती घाटांची झाली आहे. शासनाने देवळी येथील महालक्ष्मी टाऊन परिसरातील मोठमोठ्या रेती ढिगारांची रॉयल्टी तपासणी करण्याची आवश्यकता आहे. तसेच अवैध रेती ढीगारे सील करण्याची आवश्यकता आहे तसेच लिलाव न झालेल्या घाटांमधून होणारे अवैध रेती उत्खनन शासनाने लक्ष देऊन त्वरित थांबवावे व दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी देवळी तालुक्यातून नागरिक करीत आहे.