देवळी पोलिसांवर काजळसरा येथील नागरिकांचा गंभीर आरोप,देवळी पोलिसांची दादागिरी अशीच सुरु राहील का?सर्व सामान्य नागरिकांना होतोय त्रास.

0

🔥देवळी पोलिसांवर काजळसरा येथील नागरिकांचा गंभीर आरोप.🔥देवळी पोलिसांची दादागिरी अशीच सुरु राहील का?सर्व सामान्य नागरिकांना होतोय त्रास.

🔥हाच तो धार्मिक कार्यक्रमात उन्माद करणारा रविंद्र भानुदास दुधे देवळी पोलिसांनी केली अटक.

🔥हीच ती गावकऱ्यांनी केली पोलीस गाडीवर दगडफेक त्यामध्ये एक गृहरक्षक किरकोळ जखमी.

🔥हीच ती काजळसरा येथील महिलेशी घेतलेली मुलाखत.

🔥देवळी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज,संतप्त गावकऱ्यांनी केला उशिरा रात्रीपर्यंत देवळी पोलीस स्टेशनचा घेराव.

देवळी -/ देवळी वरून सात कि.मी. अंतरावर असलेल्या काजळसरा या गावामध्ये बुधवार दि. 15 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काजळसरा येथे बौद्ध विहारात जेवणाच्या कार्यक्रमा सोबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरळीत सुरू असताना गावातील नशेबाज तरुण रवींद्र भानुदास दुधे रा.काजळसरा याने कार्यक्रम स्थळी जाऊन महिलांना व आयोजकांना शिवीगाळ केली. व त्यानंतर जेवणाची पंगत बसली असताना दुचाकी गाडी जेवणाच्या पंक्तीत घालून जेवणाची पंगत उधळून लावली त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक व रवींद्र दुधे यांच्यात वाद झाला या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.
गावातील पोलीस पाटलांनी घटनेची माहिती देवळी पोलीस स्टेशनला फोन करून दिली असता देवळी पोलीस  घटनास्थळी पोहोचून आरोपीस अटक करून नेले.
त्यानंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती याची माहिती देवळीचे ठाणेदार अमोल मंडळकर यांना कळताच ते तेही काजळसरा येथे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी लोकांचा जमाव होता जमाव व देवळीचे ठाणेदार यांच्यामध्ये बाचाबाची झाली परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून देवळीचे ठाणेदार अमोल मंडळकर यांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला त्यामुळे जमाव बेभान होऊन सैरावैरा पळू लागले व त्यानंतर जमाव एकत्रित येऊन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली परिस्थिती अवक्या बाहेर जाताना पाहून ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला परिणामी पोलीस गाडीचे मागचे काच फुटले व एक गृहरक्षक दलातील जवान किरकोळ जखमी झाल्याचे कळते.
त्यानंतर रात्री दहा ते अकरा वाजताच्या सुमारास काजळसरा गावातील शेकडो महिला पुरुषांनी देवळी पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि ते आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करू लागले तसेच ठाणेदारांनी केलेल्या लाठीचार्ज बाबत निषेध व्यक्त करू लागले परिस्थिती अवाक्य बाहेर जाताना पाहून देवळी येथे दंगल नियंत्रण पथकाला प्रचारण करण्यात आले. आणि रात्री घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेडे देवळी येथे उशिरा रात्री दाखल झाल्या त्यांनी उग्र झालेल्या जमावाशी चर्चा करून आरोपीवर योग्य कारवाई करण्याबाबत व तसेच जमावाच्या अन्य मागण्यांवर सुद्धा तपास करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले गावकऱ्यांनी काजळसरा गावामध्ये खुलेआम पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारूचे धंदे चालत असल्याचे सांगितले व ते त्वरित बंद करण्यात यावे गावातील दारू विक्रेतांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा जमावाकडून करण्यात आली.
उशिरा रात्री दोन वाजेपर्यंत हे प्रकरण सुरू होते आणि यादरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेडे यांनी जमावाच्या मागण्या मान्य करून आरोपींवर व तसेच अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देऊन या तणावपूर्ण स्थितीचे निवारण केले.
सध्या देवळी पोलिसांनी आरोपीला विविध कलमांतर्गत कारवाई करून अटक केली आहे तसेच काजळसरा गावात तणावपूर्ण शांतता आहे या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेडे यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलीस करीत आहे.(क्रमशः)

          सागर झोरे साहसिक       News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!