आर्णी बसस्थानकात प्रवाशांसाठी पाणपोई सुरू – सामाजिक उपक्रमाचे कौतुक…

0

🔥आर्णी बसस्थानकात प्रवाशांसाठी पाणपोई सुरू – सामाजिक उपक्रमाचे कौतुक.

आर्णी,यवतमाळ -/ वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आर्णी एस.टी. बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची तहान भागविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष (विदर्भ) जाकिर हुसैन, सामाजिक कार्यकर्त्या कंचन कवाडे व वाहतूक निरीक्षक देवेंद्र धारवड यांच्या पुढाकारातून पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

आर्णी बस स्थानकात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथे माजी आमदारांच्या हस्ते बसविण्यात आलेले वॉटर फिल्टर मागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ते दुरुस्त करून सुरू करण्यासाठी आगार प्रशासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. परिणामी, विविध गावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजून बाटली विकत घ्यावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत सुरू करण्यात आलेल्या पाणपोईमुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. स्थानकात उपलब्ध करून देण्यात येणारे थंडगार पाणी पिऊन प्रवाशी समाधान व्यक्त करत आहेत. यावेळी, राजेन्द्र तलवटकर, राजु दाभेकर (पोलीस), सलिम शेख (दिग्रस आगार), शेख अफसर (हमाल), रहुप शेख (हमाल), श्रीकांत पवार, गणेश लोंढे, अज्जू शेख, हिरामन भगत, खुशाल पवार उपस्थित होते.

या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, नागरिकांकडून संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर बंद पडलेले वॉटर फिल्टर दुरुस्त करून कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

       ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 आर्णी,यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!