देशात वेगळ्या प्रकारची हुकूमशाही – शरद पवार.

0

हिंगणघाट  / आताची परिस्थिती बघता सध्या देशात वेगळ्या प्रकारची हुकूमशाही सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.ते हिंगणघाट येथे महाविकास आघाडीचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकसभा उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ टाका ग्राउंड येथे प्रचार सभे दरम्यान बोलत होते.ही आगळीवेगळी निवडणूक असल्याचे पुढे बोलताना शरद पवार म्हणाले.सध्याचे सत्ताधीश पुन्हा सत्तेवर बसल्यास जनतेला याची मोठी किंमत मोजावी लागेल असेही ते म्हणाले.सत्ता हाती आल्यावर यांनी फक्त विरोधकांना जेलची हवा दाखवली असे म्हणताना ज्यांनी दिल्लीचा चेहरा मोहरा बदलविला त्या केजरीवालांनाही तुरुंगाची हवा दाखविण्यास यांनी मागेपुढे बघितले नाही त्यामुळे सध्या देशात सुरू असलेली वेगळ्या प्रकारची हुकूमशाही थांबविण्यासाठी व सर्व सामान्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी सत्ता बदल गरजेचे असल्याचे पुढे बोलताना पवार म्हणाले.तसेच बाबासाहेबांची घटना बदलविण्याचा प्रयत्न केला तर भारत पेटेल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी शेवटी दिला.देश मजबूत करायला एका पक्षाचे सरकार नको – उद्धव ठाकरे देश जर मजबूत करायचा असेल तर एका पक्षाचे सरकार नको तर आघाडीचे सरकार हवे असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.सुरुवातीला मी एका पक्षाच्या सरकारच्या समर्थनात होतो.एका पक्षाचे सरकार असल्यास ते मनमानी करते.त्यामुळे आघाडीचे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे असे पुढे बोलताना ठाकरे म्हणाले.मोदी घराणेशाहीवर बोलतात पण ज्यांना घराणेच नाही त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे बोलतांनाच माझा विठ्ठल माझ्यासमोर बसला आहे हा विठ्ठलच आम्हाला सत्तेचे द्वार खुले करून देईल हा विश्वास व्यक्त करुन या देशात फोडाफोडीचे व हुकूमशाहीचे प्रकार चालले आहेत त्याचा आपल्याला विरोध असल्याचे ठाकरे म्हणाले.आमच्या पक्षातील याला त्याला खोके देऊन फोडले मग मला किती खोके मिळाले असते?असा प्रश्न उपस्थित करून मला खोक्यांची नाही तर जनतेच्या या वैभवाची गरज आहे असे म्हणुन मोदी हे हिंदुत्व बदनाम करीत असल्याचे ते म्हणाले.त्यांनी शिवसेनेचे चिन्ह चोरले. यासाठी निवडणूक आयोगाचा गैरवापर केला.आमची नकली सेना नाही आम्ही असलीच हे त्यांनी यावेळी ठासून सांगितले हे रामाचे व हनुमानाचे नाव घेऊन मतदान मागतात तर आम्ही भवानी म्हटलेले काय गैर आहे असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. महाराष्ट्रातील उद्योग यांनी गुजरातला नेले.एकही उद्योग विदर्भात आणला नाही. शेतकऱ्यांची अवस्था दयनिय केली.अशा सत्तेला खाली खेचून कोणत्याही परिस्थितीत अमर काळे हेच विजयी होणे गरजेचे असल्याचे भाषणाच्या अखेरीस ते म्हणाले यावेळी आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांनीही आपल्या जोरदार शैलीत भाषण देऊन मोदी सरकारचा समाचार घेतला.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्ष रोहिणी खडसे, आमदार अनिल देशमुख,आमदार रणजीत कांबळे, चारुलता टोकस, माजी आमदार प्रकाश गजभिये, प्रकाश पोहरे,उमेदवार अमर काळे,सुधीर कोठारी,माजी आमदार राजू तिमांडे,माजी आमदार वीरेंद्र जगताप,अतुल वांदिले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू खूपसरे इत्यादींची उपस्थिती होती.सभेला मोठ्या प्रमाणावर पुरुस व महिलांची उपस्थीती होती.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज /24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!