बीड़कीन,पैठण -/तालुक्यात बिडकीन मोठी बाजारपेठ असून हे डीएमआयसी मध्ये रूपांतर झालेले आहे त्यातच अवैध घुटख्याचे मोठे बाजारपेठ म्हणून जिल्ह्यात ओळखले जाऊ लागले. करोडो रुपयांचा गुटख्यांची उलाढाल बिडकीन परिसरात होते.घुटख्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अन्नभेसळ प्रशासनाने दैनिक सहासिक व्रत्तपत्राची दखल घेत दि.१६ मंगळवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी जोत्सना जाधव यांनी बिडकीन बसस्थानक समोरील ए वन पान शॉपमध्ये धाड टाकून शासनाने प्रतिबंधित केलेला ३०३० रुपयांचा गुटखा जप्त केला.आवेस नासेर पठान वय २२ वर्ष रा. बीडकीन ए वन दुकान मालकावर कलम १२३,२२४ २७४, २७५ भारतीय न्याय संहिता व सहकलम २६ (२)i, २६(२)ii,२६(२)iv,२७(२) ई,३०(२) ए अन्न आणि सुरक्षा मानके अधिनियम २००६ प्रमाणे बिडकीन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस मा.कोर्टात हजर केले असता आरोपीस एक दिवसाची पोलिस कोठड़ी देण्यात आली असून या तपासात बीड़कीन मधील मोठे घुटखा गुंडांची नावे उघड़ होण्याची शक्यता आहे. कार्यवाही होताच बीड़कीनमधील घुटखा माफियांचे धाबे दानणले असून बिडकीन बस स्टँड वरती ए वन पान सेंटर वरती अन्न भेसळ अधिकाऱ्यांची कारवाई चालू असताना बिडकीन येथील इतर मोठ मोठे दिग्गज गुटखा व्यापाऱ्यांनी करोडो रुपयांचा माल 1 तासात गोडाऊन खाली करून बिडकीन शहराच्या बाहेर लंपास केला.शासनाने बंदी केलेल्या घुटखा येतो कुठून याची चौकशी होणे महत्वाचे आहे.घुटखा धंद्यात आडमाप पैसा असल्याकारण बिडकीन मधील घुटखा माफीयांनी आतापर्यंत करोडो रुपयांची संपत्ती जमवलेली आहे.अन्नभेसळ व स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी अशा कार्यवाया केल्या तर नक्कीच गुटखा माफियांच्या मुस्क्या आवडल्या जातील अशी जनतेत चर्चा आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक माने हे करीत आहेत.