नवरात्र निमित्त सुरगावला महाआरतीचे व लंगर चे आयोजन…. 

0

🔥नवरात्र निमित्त सुरगावला महाआरतीचे व लंगर चे आयोजन.

सेलू -/ नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सुरगावला महाआरतीचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शाम वानखेडे व मित्रपरिवाराच्यावतीने करण्यात आले होते.यावेळी माता भवानीची पूजा करून श्री संत नानाजी महाराज भजन मंडळ सुरगावच्या संचाने नारायणराव पाटील, संजय ठाकरे यांच्या मार्गदर्शनात भजनाचा अप्रतिम कार्यक्रम सादर केला. चिंतामणी बादल भवानी ग्रुप पवनार च्या संचाने महाआरतीचा कार्यक्रम सादर केला.आपल्या सुमधुर स्वराने वाद्याच्या गजरात व भाविकांच्या उपस्थितीत परिसर देवीच्या जागृतीने मंत्रमुग्ध झाला होता.यावेळी गावातील कुमारी नविका तिमांडे,कुमारी आचल मंगाम,कुमारी संजीवनी मंगाम,कुमारी सानू येंगडे कुमारी अस्मिता भांनसे, कुमारी निशा डोंगरे, कुमारी अपूर्वा मेश्राम, निखिल वानखेडे सौ प्रियंका निखिल वानखेडे यांनी मनोभावे आरती सादर केली .महाआरतीचा कार्यक्रम संपन्न होताच लंगरला सुरुवात होऊन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी अभय पाटील, मनोज वानखेडे, वैभव मेहता, किशोर वानखेडे, राजू भगत, विशाल भोयर ,अशोक वानखेडे, सविता तीमांडे, अस्मिता येंगडे ,अंजना मेश्राम, प्रमिला पाटील ,छाया भोयर ,कुंदा वानखेडे, होमदेव वानखेडे, अनिकेत ठाकरे, मंगेश कांबळे, अंकुश शेंडे, लहू शेंडे, अनंता (भोला)पाटील ,ऋषभ तराडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

चैताली गोमासे साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!