प्रशासकीय अधिकारी गणेश उगे यांच्यावर कमिशनखोरीचे गंभीर आरोप; ग्रामस्थांची हकालपट्टीची मागणी

0

🔥हाच तो प्रशासकीय अधिकारी गणेश उगे यांच्यावर कमिशनखोरीचे गंभीर आरोप; ग्रामस्थांची हकालपट्टीची केली मागणी.

हिंगणघाट -/ शहरालगतच्या काजळसरा ग्रामपंचायतीत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत गणेश उगे यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नरसाळा स्मशानभूमीच्या विकासकामात ठेकेदाराकडून तब्बल १ लाख २० हजार रुपयांचे कमिशन घेतल्याचा आरोप होत असून, यासंदर्भात ठोस पुरावे उपलब्ध असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांमध्ये ठेकेदारांना पुढे करून काम सुरू होण्यापूर्वीच कमिशन उकळण्याची पद्धत राबविली जात असल्याची चर्चा आहे. ठेकेदारांवर दबाव टाकून आर्थिक व्यवहार केल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.

यापूर्वी काजळसरा येथील रुग्णालय बांधकाम प्रकरणातही कमिशनची मागणी झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच गणेश उगे यांच्यावर पूर्वीही अशाच प्रकारच्या प्रकरणात निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती स्थानिक स्तरावर चर्चेत आहे.

या गंभीर आरोपांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून सेवेतून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.(क्रमशः)

     ईकबाल पहेलवान साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!