प्रहार जनशक्ती पक्षाला डॉक्टर विवेक सोनवणे यांची सोडचिठ्ठी देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश

0

 

मुक्ताईनगर / पंकज तायडे

प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ. विवेक सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रहारला सोड चिठ्ठी देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटने मध्ये प्रवेश केला आहे.
तसेच डॉक्टर विवेक सोनवणे यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलनं मोर्चे तसेच दिव्यांग बांधवांसाठी मोठे कार्य केले आहे सातत्याने ते शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना असतील किंवा शेतकरी कोणत्या योजनेपासून वंचित राहत असेल त्यासाठी त्यांनी लक्षवेधी आंदोलन मोर्चे करून जिल्ह्यामध्ये प्रहार संघटनेची चांगलीच मोठी बांधणी केली होती परंतु जिल्ह्यात पक्षाच्या अंतर्गत वादामुळे त्यांनी आता थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप ,स्वाभिमानीचे नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे त्यांच्यासह अन्य कार्यकर्ते त्यावेळेस उपस्थित होते
हा प्रवेश सोहळा नाशिक येथील द्राक्ष व ऊस परिषदेत भव्य स्वरूपात घेण्यात आला होता डॉक्टर विवेक सोनवणे यांनी तालुक्यासह अन्य ठिकाणातील कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले होते त्यांचाही त्या कार्यक्रमाप्रसंगी प्रवेश करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!