🔥प्रामाणिकपणाची अनोखी झलक,रस्त्यात सापडलेला महागडा मोबाईल सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांनी केला परत.
🔥मोबाईल स्मार्ट फोन वर्धा जिल्ह्याचे नामवंत उद्योजक प्रदीप बजाज यांचा असल्याचे निष्पन्न.
🔥प्रदीप बजाज यांनी विल्सन मोखाडे यांचा केला सत्कार.
वर्धा -/येथील सुपरिचीत सामाजिक कार्यकर्ते तथा एका साप्ताहिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक विल्सन मोखाडे यांनी रस्त्यात सापडलेला वन प्लस कंपनी चा ४७ हजार रुपये किंमती चा महागडा स्मार्टफोन मोबाईल त्यांनी कोणताही हाव न बाळगता मूळ मालकाच्या स्वाधीन केला या प्रामाणिक कृत्यामुळे मोबाईल हरवलेल्या व्यक्ती ला मोठा दिलासा मिळाला असून शहरात या प्रामाणिकपणाची जोरदार चर्चा होत आहे.सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दि.४ जून रोजी सायंकाळ ७ वाजता च्या सुमारास सेवाग्राम रस्त्याने जात असतांना विल्सन मोखाडे यांना जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्याच्या मधोमध एक मोबाईल पडलेला आढळला. विल्सन मोखाडे यांनी तो मोबाईल फोन उचलुन सरळ वर्धा शहर पोलिस ठाण्याची वाट धरत तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सर्व हकीकत सांगितली.दरम्यान पोलिसांनी मोबाईल मालकाला त्याच सापडलेल्या मोबाईल ने संपर्क साधून वर्धा शहर पोलिस ठाण्यात कागदपत्रे घेऊन बोलावले.काही वेळातच वर्धा जिल्ह्याचे नामवंत उद्योजक प्रदीप बजाज यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत माझाच मोबाईल फोन असल्याचे पोलिसांना सांगितले.दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिसांनी मोबाईल फोन प्रदीप बजाज यांच्या स्वाधीन केला.आपला महागडा मोबाईल फोन व त्यातील महत्वाची माहिती (डेटा) सुरक्षित परत मिळाल्याने प्रदीप बजाज यांनी विल्सन मोखाडे यांचे मनापासून आभार मानून कृतज्ञता अर्पण केली.सध्याच्या युगात कोणतीही हरविलेली महागडी वस्तू परत मिळणे कठीण असते.अशातच आज च्या धावपळी व धकाधकीच्या युगात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असतांना विल्सन मोखाडे यांनी वस्तू परत करुन माणूसकी चे उत्तम उदाहरण सादर केले आहे.अशा काळात विल्सन मोखाडे यांनी दाखवलेला हा प्रामाणिकपणा सामान्यांसाठी एक उत्तम आदर्श ठरला आहे.अखेर मोबाईल फोन प्रदीप बजाज यांच्या स्वाधीन करतांना सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत होता.या घटनेतून प्रामाणिकपणा आणि माणुसकी जगात आज ही शिल्लक आहे याची पुष्टी विल्सन मोखाडे यांच्या रुपात झाली.सोबतच माणुसकी च्या नात्याची घट्ट विण ही प्रत्येक प्रसंगी प्रामाणिक व्यक्तींच्या सोबत असते हे या वरुन पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनी व नागरिकांनी व्यक्त केले.या प्रामाणिक कार्य आणि सद्गुणामुळे सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.