बांबरडा गावात चक्रीवादळचा तडाखा दहा घरावरील टीनपत्रे उडाली ३५ विधुत खांब जमिनीवर कोसळले सुदैवाने जीवितहानी टळली…

0

दोन व्यक्ती किरकोळ जखमी,सह तिनं जाणवरे किरकोळ जखमी.ग्रामसेवक,तलाठी यांनी तळ ठोकून दिवसभर केली पाहणी.

आष्टी शहीद / आष्टी तालुक्यातील बांबरडा गावात २८ एप्रिल रोजी पहाटे ५.१०वाजता सुमारास सकाळी अचानक विजेचा कडकडाट झाला. चक्रीवादळ निर्माण होऊन वादळी वारा आला आणि त्यात ३५ विधुत खांब जमिनीवर कोसळले तर गावातील दहा घरावरील टिनपत्रे उडाली.यां घटनेत तिनं जणांना किरकोळ ईजा झाली असून तिनं जनावरे किरकोळ जखमी झाले.यां घटनेचा पंचनामा तलाठी हसीब शेख,ग्रामसेवक अनुराधा धारपुरे यांनी दिवसभर तळ ठोकून केला.
सविस्तर असें कि,आष्टी तालुक्यातील माळरान भागात वसलेल्या बांबरडा गावात २८ एप्रिल रोजी आज पहाटे ५ वाजता च्या सुमारास सकाळी चक्रीवादळ सह सुसाट्याचा पाऊस व गारपीट झाली यामध्ये दहा घरावरील टीनपत्रे उडाली तर पन्नास घरावरील कवेलू उडाली.शेवन्ता भलावी यांच्या घरावरील टीनपत्रे उडून दूरवर जाऊन पडली याच घरी एक महिला किरकोळ जखमी झाली तर दोन जण किरकोळ जखमी झाले.तसेच गजानन भैय्यालाला घटी यांच्या घरावरील टीन पत्रे उडाली घरातील अन्न धान्य पाण्यात भिजली पती पत्नी सुदैवाने वाचले.तिसरी गंभीर घटना नामदेव चांदिवले यांच्या कडे यांच्या घरावरील टीनपत्रे एक किलोमीटर अंतरावर जाऊन पडली.श्रीराम धुर्वे यांच्या घरावरील टीनपत्रे सिलिंग पंख्यांसाह दूरवर जाऊन पडली.भगवान मडावी, पंजाब मडावी,वंदना चांदिवले,याच्या घरांची पडझाडं झाली.गावात काही ठिकाणी विधुत मीटर ची तोडफोड झाली.सुरज ताईवाडे यांच्या घरात पाणीच पाणी साचले होते.रामभाऊ घटी यांच्या घरावरील कवेलू उडाली.यां झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी हसीब शेख, ग्रामसेवक अनुराधा धारपुरे,सरपंच लता कडताई,पोलीस पाटील मोहित बगलेकर,सामाजिक कार्यकर्ता गणेश कडताई,उपसरपंच रमेश बगलेकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा चेले,माजी उपसरपंच रामभाऊ घटी,यांनी घरोघरी जाऊन पाहणी करित नुकसानी चा सर्वे केला.दिवस भर तलाठी शेख यांनी गावात तळ ठोकून गावातील समस्या समजून घेतल्या.३५ विधुतखांब जमिनीवर पडल्याने विधुत व्यवस्था खंडित झाली होती.गावातील वीज वितरण व्यवस्था सुरळीत न झाल्याने व वीज वितरण कंपनी चा कोणताही अधिकारी फिरकला नसल्याने दिवसभर वीज वितरण व्यवस्था कोलमडली होती.गावात पाणी टंचाई असून पाणी सोडण्यासाठी लाईन नाही आणि प्यायला पाणी नाही यामुळे गावात आक्रोश पाहायला मिळत होता.तलाठी,ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये तळ ठोकून आहॆ.
वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कारंजा,आष्टी,सारवाडी येथील विधुत अभियंता यांना दूरध्वनी वरून माहिती दिली तेव्हा उडवा उडावीचे उत्तरे देण्यात आली. प्रशासनाने नुकसान झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली.

नरेश भार्गव साहसिक न्यूज / 24 आष्टी शहीद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!