🔥जागोजागी साचते सांडपाणी,गावकरी म्हणतात आमचे आरोग्य धोक्यात.
देवळी -/ तालुक्यातील बाबुळगाव खोसे दोन हजार लोक वस्तीचे गाव आरोग्य विषयक दक्षता घेण्यापासून कोसो दूर आहे.गावामध्ये पावसाचे व सांडपाणी वाहून जाण्याकरिता पक्क्या नाल्या नाही.त्यामुळे जागोजागी पाण्याची टक्के साचले असल्याचे पहावयास मिळाले. पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्यामुळे अनेकांच्या घरी पाणी शिरत असल्याचे गावकरी मंडळीने सांगितले.प्रत्यक्षात पाहणी मध्ये घराशेजारी पाण्याचे टक्के साचलेले दिसून आले.वार्ड क्रमांक दोन मधील महिला व पुरुषांनी गावातील सांडपाणी साचलेले पाणी पावसाचे जोरदार पाणी घरात शिरते अशी माहिती घेऊन आरोग्याला धोका निर्माण असल्याचे सांगितले. गावामध्ये सिमेंट रस्ते बांधण्यात आले काही ठिकाणी रस्त्याला तडा गेले आहे रस्ते आहे पण नाल्याच नाही त्यामुळे पाणी वाहून जात नाही व साचून राहते.
पाणी सतत असल्याने मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे नाल्या साफ करण्याकरिता आम्ही श्रमदान करतो पण काही उपयोग होत नाही.उलट पाणी सतत असल्यामुळे त्रास सहन करावा लागतो.गावातील महिला व पुरुषांनी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविषयी टीका केली.गावात वीज पुरवठा दिवाबत्ती कीटकनाशक फवारणी अशा विविध सुविधाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले.गोमाजी सोनवणे,पुरुषोत्तम भंबारे,धनराज तडाम,प्रमोद भुसे, दिलीप मरापे,जोशना अंबाडे,शारदा नेहारे,चंद्रकला मरापे,गणेश ठाकरे, यांनी संवादामध्ये शेतातील पाणी गावात येते ते पाणी वाहून जाण्याकरिता सिमेंट नाली बांधण्यात यावी अशी मागणी असल्याचे सांगितले.यांचे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले
विकास निधीचा अभाव व विकास निधी कमी मिळाला आमदार फंडातून पाच लाख 25 हजाराचे काम झाले परत सहा लाखाचे काम प्रस्तावित आहे माझी ओळख नाही त्यामुळे निधी आणण्यामध्ये प्रयत्न कमी पडत असल्याचे सांगितले.शेताचे पाने गावाबाहेर काढण्याचे ठराव ग्रामपंचायतीने दिले आहे निधी आल्यावर कामे होतील.गावाच्या समस्या आरोग्य धोक्यात येत आहे शासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे याकरिता गावातील पराग तडस, राकेश महल्ले, सुवर्णा उईके,सुनीता सोनवणे व इतरांनी समस्येसह साहसिक न्यूज 24 च्या प्रतिनिधी शि संवाद साधला. (क्रमशः)