बाभुळगाव खरेदी-विक्री संघाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; संचालक चमडीचोर लुच्छा सतिष मानलवार यांच्यावर अनधिकृत ताबा आणि दोन कोटींच्या खत घोटाळा 

0

🔥हाच तो यवतमाळ जिल्हा भाजप पार्टी चा सचिव चमडीचोर सतीश उर्फ लुच्चा मानलवार

🔥बाभुळगाव खरेदी-विक्री संघाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; संचालक चमडीचोर लुच्छा सतिष मानलवार यांच्यावर अनधिकृत ताबा आणि दोन कोटींच्या खत घोटाळा 

🔥शेतकऱ्यांच्या नावाखाली दोन कोटींच्या बोगस खत विक्रीचा आरोप; भाजप जिल्हा चमडीचोर लुच्छा सचिव सतिष मानलवार यांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी

​यवतमाळ -/ ​बाभुळगाव येथील शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघातील कथित गैरव्यवहार आणि भोंगळ कारभाराबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि तक्रारदारांनी गंभीर आरोप केले आहेत. संघाचे संचालक तथा भाजपचा जिल्हा सचिव चमडीचोर लुच्छा सतिष मानलवार यांनी संघाच्या मालकीचे गोडावून आणि दुकान अनधिकृतपणे भाडेतत्त्वावर घेऊन लाखो रुपयांचे भाडे थकवल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच, शेतकऱ्यांच्या नावाखाली तब्बल दोन कोटी रुपयांच्या बोगस खताची विक्री केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांच्यावर करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या बाभुळगाव खरेदी-विक्री संघाच्या कारभारावर स्थानिक स्तरावरून तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संघाचे विद्यमान संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव चमडीचोर लुच्छा सतिष मानलवार यांच्यावर पदाचा गैरवापर करून आर्थिक अनियमितता केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात तालुक्यातील विविध ठिकाणी लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे.

तक्रारदारांनी केलेल्या दाव्यानुसार चमडीचोर लुच्छा सतिष मानलवार हे खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदी निवडून आल्यानंतर संघाच्या मालमत्तेचा बेकायदेशीर वापर सुरू झाला. मानलवार यांनी संघाच्या मालकीचे गोडावून आणि दुकान भाडेतत्त्वावर घेतले आहे. मात्र, ही भाडेपट्टीची प्रक्रिया पूर्णपणे अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. सहकार कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करून ही मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेष म्हणजे, या गोडावून आणि दुकानाचे लाखो रुपयांचे भाडे त्यांनी थकवले असून, यामुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा खत विक्रीशी संबंधित आहे. सतिष मानलवार यांनी शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून तब्बल दोन कोटी रुपयांच्या बोगस खताची विक्री केल्याचा आरोप तक्रारींमधून करण्यात आला आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार खताची गरज असताना, अशा प्रकारे बोगस खताची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. हा दोन कोटी रुपयांचा खताचा साठा नेमका कुठून आणला गेला, त्याची खरेदी-विक्री कोणत्या कागदपत्रांच्या आधारे झाली आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. बाभुळगाव तालुक्यातील अनेक नागरिक आणि शेतकऱ्यांनी या गैरप्रकारांविरोधात आवाज उठवला असून संबंधित विभागांकडे तक्रारी सादर केल्या आहेत. एका जबाबदार पदावर असताना आणि राजकीय पक्षाचे जिल्हा सचिव म्हणून कार्यरत असताना अशा प्रकारचे आरोप झाल्याने तालुक्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. संस्थेची थकीत रक्कम तात्काळ वसूल करावी, अनधिकृत ताब्यात घेतलेले गोडावून आणि दुकान मोकळे करावे, तसेच बोगस खत प्रकरणाची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. ​दुसरीकडे, या सर्व आरोपांबाबत संबंधित प्रशासन आणि सहकार विभाग नेमकी काय भूमिका घेते आणि सतिष मानलवार या आरोपांवर काय स्पष्टीकरण देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!