आष्टी -/ तालुक्यातील साहुर हे गाव सर्कलचे असुन याठिकाणी जवळपास दहा हजार लोकसंख्या असुन चार वार्ड आहेत प्रत्येक वार्ड ची अंगणवाडी सुद्धा आहेत परंतु या गावात अंगणवाडी बांधकामात मोठा घोळ झाला असुन वार्ड क्र. १ च्या मुलांना वार्ड क्र. ४ मध्ये जावे लागतात तर वार्ड क्र. ४ च्या मुलांना वार्ड क्र. १ मध्ये यावे लागतात यामध्ये सर्वसाधारण अर्धा किलोमीटर अंतर असुन वाहतूकीचे रस्ते ओलांडावे लागतात याआधी एका चिमुकलीचा अपघात सुद्धा झालेला होता त्यामुळे लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत एक वर्षाच्या आधी पालकांनी निवेदन सुद्धा दीले होते तेव्हा लोखंडे यांनी पालकांची दीशाभुल करून पुढील सत्रात आपण ऑनलाईन प्रक्रिया करून मुलांच्या सोयीनुसार अंगणवाडीत बसवु अशी खोटी माहिती दीली आणि आता नविन इमारतीचे उद्घाटन करा आम्हाला बोलवा उद्घाटनाला सरपंच आले नाही तरी चालेल पण वार्ड क्र.१ चे मुले वार्ड क्र.४ मध्येच बसतील आणि वार्ड क्र.४ चे मुले वार्ड क्र.१ मध्येच बसतील अशाप्रकारची हिटलरशाही हा अधिकारी साहुर गावात करत आहे हा अपमान सरपंच पदाचा नसुन गावाचा अपमान असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अंगणवाड्यावर बहिष्कार टाकुन पालकांनी आपल्या मुलांना अंगणवाडीत पाठवणार नसल्यानचे सांगितले आता साहुर गावातील सरपंच उपसरपंच सदस्य व पालक वर्ग आक्रमक झाले असून अशा हिटलरशाही करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून निलंबित करण्याची मागणी वर्धा येथे जाऊन निवेदनाद्वारे डेप्युटी सीईओ आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना करणार असल्याचे या सर्वांनी सांगितले हे विशेष