बिबट्याने केले गाईला फस्त ; पवनार शिवारातील घटना

0

बिबट्याने केले गाईला फस्त ; पवनार शिवारातील घटना, शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

सतीश अवचट / पवनार:
येथील शेतशिवारातील दिलीप घुगरें यांच्या शेतात बांधून असलेल्या गाईला शुक्रवारी रात्रीचे सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली, ही बाब आज शनिवारी सकाळी उघडकीस आली.
पवनार शिवारात धाम नदी लगत दिलीप घुगारे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात 3 गाई बाधून होत्या, त्यामधील एका गाईचे दावे तोडून त्याला शेतालगत असलेल्या नाल्याजवळ फरफटत नेऊन त्याच्यावर ताव मारला. फरफटत नेल्याच्या खुणा शेतात स्पष्ट दिसत होत्या.
या घटनेची माहिती लगेच वनविभागाच्या कर्मचाऱ्याला देण्यात आली, परिसरातील खाना खुणा तपासल्या असता बिबट्याने गाईची शिकार केली असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले.
परिसरात कॅमेरे लावले असून रात्री परत हा बिबट्या परिसरात येण्याची शक्यता वर्तविली आहे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन वान विभागाने केले असून पवनार मध्ये प्रथम तः सदर घटना घडल्याने शिवारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!