बि एस एन एल च्या लिंक फैल मुळे महिना भरा पासून अंतोरा गावातील नागरिक त्रस्त,बँकेत माराव्या लागतात चकरा…

0

आष्टी शहीद / तालुक्यातील अंतोरा भागात व गावात BSNL ची इंटरनेट सेवा महिनाभर पासून काम करित नसल्याने मोबाईल सह बँकेत पैसे काढायला जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहॆ. जेष्ठ नागरिकांना बॅंकेत गेल्यावर लिंक नाही असें म्हटल्यावर दिवस भर ततकाळात बसण्याची वेळ महिन्या भरापासून आली आहॆ.सविस्तर असें कि,आष्टी तालुक्यातील अंतोरा, देलवाडी, अंबिकापूर, माणिकनगर, जोळवाडी, लहान आर्वी, चिंचोली, यां गावात BSNL ची मोबाईल ला रेंज राहत असते म्हणून यां गावातील नागरिकांनी यां भागात BSNL चे मोबाईल घेतले आहॆ. गेल्या महिन्या भरापासून मोबाईल ची लिंक राहत नसून संपर्क होत नाही. तसेंच याच भागात एकमेव बँक, बँक ऑफ इंडिया ही बँक आहॆ. यां भागातील नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी अंतोरा गावं गाठून पैसे काढावे लागते. परंतु बँकेत गेल्यावर लिंक राहत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.वारंवार होणाऱ्या यां त्रासातून मुक्ती मिळावी अशी मागणी येथील नागरिकांची आहॆ.

🔥सतत बँकेत चकरा मारून नागरिक त्रस्त🔥

महिनाभर पासून मी बँकेत पैसे काढायला जात आहॆ पण तेथे गेल्यावर लिंक राहत नाही. पैसे काढण्यासाठी आम्हाला त्रास सहन करावा लागत आहॆ.(जाकीर शेख ग्राहक अंतोरा) 

 यां भागात BSNL ची लिंक राहत नाही. ही नेहमीच समस्या असते मला यां संबंधित अधिकारी यांच्या सोबत बोलणी करून तशी तक्रार दिली आहॆ. नाही तर आंदोलन छेडल्याशिवाय पर्यय नाही.(राजेश ठाकरे सामाजिक कार्यकर्ते अंतोरा) 

नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!