🔥भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमात डॉ. अस्मिता शेंडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित ऑल इंडिया समता सैनिक दलाचे आयोजन.
वर्धा -/ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धा च्या वतीने सावंगी टी पॉइंट वर्धा येथे डॉ. अस्मिता अरुण शेंडे( लोखंडे ), सामाजिक कार्यकर्ते दिलीप गणवीर यांना प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धाच्या वतीने कॅप्टन शिलानंद झामरे यांचे नेतृत्वात , विदर्भ सचिव रमेश निमसडकर, जिल्हाध्यक्ष आशिष रत्नमाला नरेश लोखंडे , महाराष्ट्र प्रदेश सदस्य अनिल खडतकर , स्वागताध्यक्ष गौतम जुलमे ,जिल्हा सहसचिव सुनील बाभळे , जिल्हा कोषाध्यक्ष प्रफुल बनसोड ,तालुका बौद्धिक प्रमुख मिलिंद मून , जीवन निमसडकर ,दिलीप वैद्य ,धर्मपाल गोटे, चरण गायकवाड, विनोद जवादे, एड.निखिल बुरबुरे, रचना नगराळे , महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य आरती निमसडकर, जिल्हा उपाध्यक्ष सरिता कुसळे, शाखाध्यक्ष पद्माकर कांबळे , रमेश साटोने, संदीप थुल यांच्या प्रमुख उपस्थितीत संथागार बुद्ध विहारापासून सावंगी टी पॉइंट पर्यंत समता सैनिक दलाचा भव्य मार्च काढण्यात आला. भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रम आंबेडकरी विचारवंत प्रशिक आनंद, प्रा. विठ्ठल कांगणे, आंबेडकरवादी गीत गायिका वंदना सिद्धार्थ ,उत्तर प्रदेश, आंबेडकरी गझल गायिका मांजुषा शिंदे यांच्या उदबोधनाने संपन्न झाला. अध्यक्षीय विचार स्मिता श्रीकांत चव्हाण यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन तालुका बौद्धिक प्रमुख रचना नगराळे , प्रास्ताविक विदर्भ सचिव रमेश निमसडकर तर आभार अनिल खडतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रणिता खैरकर, डॉ. माधवी पाटील ,दिलीप तागडे राजकुमार बाराहाते , राजू शेंडे, दिलीप नारायने , अविनाश तामगाडगे, आनंद फुलमाळी, लीना पाटील, प्रतिभा कांबळे ,श्याम पोपटकर यांनी प्रयत्न केले.