महाराष्ट्र अंनिसच्या मध्यस्थीने प्रेमीयुगुल विवाह बंधनात…

0

गजेंद्र डोंगरे वर्धा / जात व धर्म हे मानव निर्मित असून ती अंधश्रद्धाच आहे.हि आग्रही भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून बोलल्या जात आहे.मात्र,याच जाती धर्माच्या भिंतीला नाकारून अनेक तरुण, तरुणी लग्न करतात. त्यात अनेक अडचणी,समस्या,हत्या,जबरी मारहाण,धमकी देणे या गोष्टी आजही घडतात. त्यामुळे अनेक प्रेमीयुगुल हे घरातून पळून जातात, आत्महत्या करतात अशा तरुण तरुणी यांना पाठींबा देवून लग्न लावून देण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा बंधनात निर्मूलन समिती राज्यभर करीत असून वर्धेतील मयूर जोगे व रिंकी मिश्रा या प्रेमीयुगुलांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मध्यस्थीने विवाह बंधनात बांधले गेले असून मयूर जोगे व रिंकी मिश्रा हे दोघेही वर्धा शहराला लागून असलेल्या म्हसाळा येथे राहतात दोघेही उच्च शिक्षित एकाच परिसरात असल्याने ओळख वाढली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले दोघांनीही एकमेकांच्या संमतीने लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला दोघेही कायदेशीर रित्या लग्नं करण्यास वयाने परिपूर्ण मात्र नेहमी प्रमाणे मुलीच्या कुटूबाकडून प्रखर विरोध झाला पोलीस स्टेशन पर्यंत प्रकरण गेले त्याच भागात राहणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य पदाधिकारी सारिका डेहनकर यांच्या कडे हे प्रकरण गेले. याची त्वरीत दखल घेवून राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्याशी संपर्क करून माहिती देवून लग्न लावून देण्यासाठी विनंती केली गजेंद्र सुरकार यांनी रिंकी व मयूर यांना बोलावून घेतले त्यांच्या कडून सर्व माहिती घेऊन समूपदेशन करून या लग्न कार्यात व भावी जिवणात येणा-या अडचणी समजावून सांगितल्या मात्र दोघेही लग्न करण्यावर ठाम राहिले त्यामुळे पुठे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन कायदेशीर रित्या लग्नं लावून देण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे सर्व कायदेशीर सोपस्कार पुर्ण करून मान्यवर व उपस्थितांच्या उपस्थित मयूर जोगे व रिंकी मिश्रा यांचे विधीवत लग्न वर्धा वर्धन हाट सभागृह,वर्धा येथे लावून देण्यात आले.हे लग्न लावून देण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भोसले, जिल्हा प्रधान सचिव सुनील ढाले, राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे ,विविध उपक्रम विभागाचे प्रमुख निखिल जवादे,बुवाबाजी संघर्ष विभागाचे प्रमुख भरत कोकावार, विवेक वाहिनीच्या जिल्हा कार्यवाह डॉ मंजुषा देशमुख, जिल्हा पदाधिकारी प्रतीभा ठाकूर यांनी पुढाकार घेऊन लग्नाचे सर्व विधी परंपरे नुसार पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!