महारोगी सेवा समितीचे तोतया अध्यक्ष विभाग गुप्ता निघाली “चोर”

0

विशेष प्रतिनिधी/ वर्धा :

गांधीजी व परम पूज्य विनोबा भावे यांच्या नावाचा उपयोग करीत मागील पंधरा ते वीस वर्षापासून वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्थेवर अवैध कब्जा करून विदेशी वारी व ऐश्यो आरामाचे जीवन जगणाऱ्या डॉक्टर विभा गुप्ता यांच्या पापाचा घडा भरला आहे. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून महारोगी सेवा समिती मध्ये कुष्ठरोगी बांधवांची सेवा करण्याच्या नावाखाली तोतया अध्यक्ष बनून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. महारोगी सेवा समिती मध्ये कोणत्याही संविधानिक पदावर किंवा शेड्यूल-एक वर नसताना या ४२० पणा करणाऱ्या विभा’ने’ महारोगी सेवा समितीचे सचिव म्हणून गाझियाबाद येथील ओम प्रकाश द्विवेदी यांच्या नावाने बनावट खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया व इतर शाखेत उघडले. हि बाब या संस्थेत मागील सात वर्षापासून एक रुपया मानधन न घेता निस्वार्थपणे सेवा करणारे व्यवस्थापक डॉक्टर रामजी शुक्ला यांच्या लक्षात आली व त्यांनी आपल्या व्यवस्थापकीय अधिकारांचा वापर करीत बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया व अन्य बँकेला पत्र देऊन आर्थिक व्यवहार थांबविले आहे. या विभा’ला’ कोणताही अधिकार नसताना मौजा सेलडोह येथील सोमलगड शिवरातील मुरम विकण्याचा सौदा २७ लाख रुपयात केला व मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम या विभा’ने’ विकला.

महारोगी सेवा समिती ची ३० एक्कर जमीन गुजरात येथील पटेल नामक व्यापाऱ्याला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी कोट्यावधी रुपयात दिली होती परंतु सदर बाब दैनिक साहसिक वृत्तपत्रातून प्रकाशित केली यामुळे गुजरात येथील व्यापारी पळून गेला. डॉक्टर विभा गुप्ता ‘ही’ कोणत्याही संवैधानिक पदावर किंवा संस्थेच्या शेड्युल-एक वर नामीत नसताना कुष्ठरोगी बांधवांकरिता येणाऱ्या अनुदानाची रक्कम तिचा गाजियाबादी सचिव ओम प्रकाश रघवा द्वेवेदी यांनी हडप केल्याची तक्रार साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र एन. कोटंबकार यांनी सेवाग्राम पोलीस स्टेशन मध्ये दिली परंतु येथील ठाणेदार निलेश ब्राह्मणे यांच्यावर मुंबई येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेचा तोतया डॉक्टर हरीश गुप्ता च्या दबावात असल्यामुळे विभा गुप्ता विरोधात गुन्हा दाखल करण्याची हिंमत करीत नाही.

याच संधीचा फायदा घेत या फर्जी डॉक्टर विभा गुप्ता’ने’ महारोगी सेवा समितीच्या मालकीचा एक ट्रॅक्टर, एक दाल मिल मशीन, १७ लॅपटॉप, एक संगणक चोरून नेले आहे. याबाबतची तक्रार सुद्धा सेवाग्राम पोलिसात देऊन गुन्हे दाखल तर सोडाचं साधी चौकशीसुद्धा करण्याची हिंमत पोलीस विभाग दाखवीत नाही.

हिच तक्रार एखाद्या गरीब माणसाच्या नावाने असती तर गुन्हा दाखल करून त्याचा पीसीआर घेऊन प्रकरण न्याय प्रविष्ट झाले असते परंतु आजही आपण म्हणतो कायदा सर्वांसाठी समान आहे परंतु गर्भश्रीमंत डॉक्टर विभा गुप्ता हिच्यासाठी कायदा बनला नाही का? फर्जी डॉक्टर विभा गुप्ता नामक चोरटी जवळ शासनाचा कोणताही अधिकारीक कागद नसताना महारोगी सेवा समिती मध्ये जबरदस्ती घुसून राज्य करीत आहे, ही बाब पुरोग्रामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. हिच्याच अध्यक्षारीत्यात दवाखान्यात भर्ती असलेल्या चार रुग्णांचा एका महिन्यात बळी गेला आहे, की त्यांना मारले आहे याबाबत पोलिसांना, धर्मदाय आयुक्त यांना कोणतीही सूचना न देता अंत्यसंस्कार केलेले आहे. डॉक्टर विभा गुप्ता कुष्ठरोगी बांधवांचा जीव घेऊन संस्थेची जमीन विकण्याच्या तयारीत असताना डॉक्टर रामजी शुक्ला यांनी चोरट्या विभा’ला’ आळा घातला आहे.

क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!