मांजरवघळ येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा.
श्रावण मास संपल्यावर हिंदू धर्मात पोळा हा बैलाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अशातच दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही मांजरवघळ येथे तान्हा पोळ्या निमित्त नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेमधे गावातील बालगोपालांनी आपला सहभाग नोंदविला यावेळी निवड झालेल्या स्पर्धकांना रोख बक्षिसाचे वितरण करण्यात आले.तर ईतर स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षिसे, स्कुलबॅग,शैक्षणिक साहित्य व खाऊचा वाटप ही करण्यात आला.या कार्यक्रमाला कळंब पो.स्टे. च्या पो.नि.दिपमाला भेंडे मॅडम ह्या प्रमुख पाहुणे व बक्षिस वितरक म्हणुन उपस्थित होत्या यावेळी ग्रा. पं. सदस्य व गावकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आयोजन पो.पाटील विवेक बाळबुधे यांनी केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष सराटे, चिंतामण शेंडे,मंगेश सराटे, सौरभ ठोंबरे,धीरज बोंन्द्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. सागर झोरे सहासिक न्यूज -24