माझी नाही गावाची जयंती साजरी करा,वं.राष्टूसंताचा संपूर्ण महिनाभर गावा गावात कार्यक्रम…

0

गजेंद्र डोंगरे / वर्धा…मानवतेचे महान पुजारी वं.राष्टूसंत श्री तुकडोजी महाराज वयाचे पन्नास वर्ष पुर्ण करुन एकावन् व्या वर्षांत पदार्पण करीत होते त्यावेळेस सेवा मंडळातील जेष्ठ गुरुदेव सेवक वं.राष्टूसंता ना भेटण्यास गुरुकुंजात गेली ,त्या मध्ये गीताचार्य तुकाराम दादा ,आष्टीचे गुलाबराव मामा वाघ,श्री उत्तमरावजी कंकाळे दादा,आध्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलुरकर, साहित्य रत्न सुदाम दादा सावरकर ,ही जेष्ठ मंडळी महाराजाना भेटायला गेली होती, महाराजाना जयगुरु केला,महाराज तुम्ही एकावन व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत, आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायच आहे. त्यावर महाराज हसले,तुमच्या मनात हे कसे काय आले,तुम्हाले अजुन एक बुवा तयार करायचा आहे कारे ? तुम्ही मला काय पाळन्यात टाकणार आहेत का ? अरे असे काही करु नका ,तुम्हाला काही करायचे असेल तर माझ्या जन्म तारखेचे ओचीत्य साधून १ ते ३० एप्रिल हा महीना ग्रामजयंती महीना म्हणून साजरा करा.त्यामुळे त्यावेळेस ५१ गावात ५१ श्रीगुरुदेव सेवक ५१ ग्रामगीता सोबत घेऊन गावात सामुदायिक ध्यान,सामुदायिक प्रार्थना व ग्राम स्वच्छतेचा संदेश देऊन वं.राष्टूसंता चा वाढदिवस संपन्न करण्यात येत आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्य़ात या अभियानाचा वं.राष्टूसंताच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तेव्हा पासुन वं.राष्टूसंता चा जन्म दिवस ग्राम जयंती दिन म्हणून एप्रिल महिन्यात संपन्न होतो, हे ओचीत्य साधून आध्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलुरकर विचार प्रतिष्ठान नागपुर तर्फ वर्धा जिल्ह्य़ातील वरुड,करंजी,काजी,करंजी भोगे,मदनी दिदोडा,चितोडा तळोदी भानखेडा या गावात ग्राम जयंती निमित्त विवीध रचनात्मक कार्य व सामुदायिक प्रार्थने चे विवीध गावात आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात विजय राउत,भास्कर काकपुरे,कृष्णा पाहुणे, प्रमोद कोरडे,रामदास नवघरे,विजया बबनराव भोगे,दशरथ दोलतकर, गजानन जिकार हे गुरुदेव प्रेमी परीश्रम घेत आहेत . दिनांक २१ तारखेला मदनी येथे गावकरी व शालेय मुलाना  अशोकराव दाभेकर,विजय राऊत राजु कामडी सुरेद बेलुरकर याच्या प्रमुख उपस्थितीत मुलाना वाचनीय पुस्तके व वं.राष्टूसंता च्या फोटो चे वितरण करण्यात आले यावेळेस विजय राऊत यानी वं.राष्टूसंता ची ग्राम जयंती व खेड्याकडे चला यावर गावकरी लोकाना मार्गदर्शन केले दिनांक ३० एप्रिल ला या अभियानाचा समारोप संपन्न होईल अशी माहीती गजानन जिकार यानी दिली आहे. रचनात्मक पध्दतीने वं.राष्टूसंत जन्म महोत्सव साजरा करण्याचे ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आहे.

साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!