मुलाना व्यवसायिक व उद्योजक घड़ाविण्याची प्रक्रिया म्हणजे खरी कमाई – डॉ. पंकज भोयर

0

🔥मुलाना व्यवसायिक व उद्योजक घड़ाविण्याची प्रक्रिया म्हणजे खरी कमाई – डॉ. पंकज भोयर

बोरगाव (मेघे) वर्धा -/ अलीकडे शाळांमध्ये शैक्षणिक पद्धतीत विविध प्रायोगिक उपक्रम राबविले जातात. शाळांमध्ये होणारे सांस्कृतिक स्नेहसंमेलन हे जसे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणारे ठरतात, त्याचप्रमाणे शाळांमध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून ‘खरी कमाई’ करणे ही सुद्धा प्रभावी शैक्षणिक पद्धत आहे. मुख्यतः व्यावसायिक आणि औद्योगिक शिक्षणाच्या तत्त्वावर ही आधारित असल्यामुळे विद्यार्थी यातून केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर वास्तविक जीवनातील व्यावसायिक कौशल्य स्वआचरणाने आत्मसात करतात यामुळे विद्यार्थी भविष्यातील उद्योजक किंवा व्यावसायिक बनण्यासाठी तयार होतात. शाळांमध्ये ही पद्धत ‘मिनी बिजनेस प्रोजेक्ट’ म्हणून सुरू करणे आवश्यक वाटते, यामध्ये शाळेच्या मैदानात किंवा हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी केलेले विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात आणि ग्राहक मुख्यतः इतर विद्यार्थी, शिक्षक, पालक निमंत्रित असतात यातून विद्यार्थी उत्पादन केलेल्या स्वतःच्या वस्तूची किंमत ठरवणे, विक्री करणे, नफा- तोटा मोजणे इत्यादी गोष्टी शिकतात. जोखीम घेणे, सर्जनशीलता, समस्या सोडवणे हे सुद्धा गुण यातून विकसित होतात. हे स्टॉल्स कुठल्या प्रसंगी कुठल्या वस्तूची विक्री करावी, कशा पद्धतीने करावी याचे एक आकलन विद्यार्थ्यांना करून देतात, शाळांमध्ये लागणारे हे स्टॉल्स विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगताची ओळख करून देणारे ठरतात नेमका कुठला पदार्थ निवडावा तो कशा पद्धतीने विकावा याचे व्यावसायिक ज्ञान विद्यार्थ्यांना यातून मिळते, कच्च्या मालाची किंमत त्यातून मिळणारा अपेक्षित नफा किती असावा, त्याचे मार्केटिंग कसे करावे, पोस्टर्स, स्लोगन्स, प्रमोशन, विक्री दरम्यान ग्राहकाशी बोलणे, बार्गेनिंग, फीडबॅक घेणे यामुळे विद्यार्थ्यांचे कमुनिकेशन स्किल्स वाढते. कार्यक्रम संपल्यावर नफा तोटा मोजणे, आपण काय चुकलो पुढे काय करता येईल यासाठी व्यावसायिक जगात हे सारे फार महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण) गृह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार, राज्यमंत्री व पालक मंत्री वर्धा व भंडारा जिल्हा डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले.

ते 10 जानेवारी रोजी सत्येश्वर लॉन बोरगाव (मेघे) येथे सेंट थॉमस इंग्लिश स्कूल तर्फे आयोजित या किड्स फूड फेस्ट (आनंद मेला) या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, चेतना कांबळे, कार्यकारिणी सदस्य राजू लभाने, विलास कुलकर्णी, शाळेच्या प्राचार्या प्रीती सत्याम, संचालक विजय सत्याम, सागर फोडेकर, साध्वी सत्यमित्रा, प्रशांत पांडे, सुभदा रुद्रकार, निलोफर बक्श, लीना फोडेकर, आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. या आनंद मिळवण्यात जवळपास 50 विद्यार्थ्यांनी विविध व्यंजने बनवून सहभाग नोंदविला. उपस्थित पालकांनी सर्व व्यंजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा संत व रुची तिवारी यांनी केले. तर आभार प्राचार्य प्रीती सत्याम यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण्याकरिता चैताली बारई, अश्विनी गुरनुले, आनंशा श्रीवास्तव, अश्विनी नवले, संदीप जोशी, वेदांत सत्याम, संचाली भलमे, पूजा गोसटकर, शबाना शेख, पूजा ओझा, मयुरी चव्हाण, अमृता यादव आदींनी अथक परिश्रम घेतले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!