हिंगणघाट -/सन १९७६ च्या बॉच मधील विद्यार्थ्याचा गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य फुटाणे सर होते. तर प्रमुख उपस्थिती धारकर सर, त्रिवेदी सर, शिंदे सर आणि कुरेशी सर ची होती.यावेळी माजी विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.यावेळी डॉ प्रवीण गडकरी, ईक्राम हुसैन, सुरेश पाटील, बबन जामुनकर, डॉ प्रदीप पराते, डॉ माधुरी दिघे (कूचेवार), इत्यादींनी जुन्या स्मृतींना उजाळा देत शालेय जीवनातील आठवणी काढल्या.कार्यक्रमाची सुरुवात अतिथी गण शिक्षकांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन करण्यात आली. संजय वाघ, सुरेंद्र बोरकर, डॉ आशा बनसोड, राजु मुथा, रमेश लोंढे इत्यादींनी शिक्षक वृंदाला पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देउन त्यांचा सन्मान केला.यावेळी ईक्राम हुसैन यांनी रू ११०००/_ चां धनादेश शाळेला भेट दिला.कार्यक्रमात शिक्षकांनी आपले विचार मांडताना जुन्या आठवणी ला उजाळा देताना आपल्या कारकिर्दीतील विद्यर्थ्या सोबत आपले स्नेहबंध चां आर्वजून उल्लेख केला.यावेळी माजी विद्यार्थी माजी आमदार राजु तिमांडे, विलास देवतळे, दत्ता भुरचंडी, नितीन पैठणकर, अशोक वाघमारे, शालिनी नेरलवार, चंद्रशेखर गहलोद, संजय नाहाटे गणमान्य माजी विद्यार्थी ची जवळपास ४० च्या वर उपस्थिती होती.आणि कार्यक्रम चां शेवट स्नेह भोजनाने झाला.कार्यक्रम संचालन अनिल कडू यांनी तर आभार चंद्रकांत अलोनी यांनी मानले.