राज्य सिनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत बुलढाणा संघाचा डबल धमाका.

0

महिला संघाला सुवर्णपदक तर पुरुष संघाला कास्यपदक

सब ज्युनियर ज्युनिअर व सीनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुली व महिला संघांना सुवर्णपदकाची हॅट्रिक

मलकापूर : सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस असोच्या संयुक्त विद्यमाने ११ वी महाराष्ट्र राज्य स्तरीय सिनियर सॉफ्ट टेनिस अजिक्यपद स्पर्धा दि १९ ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जळगाव येथे संपन्न झाली असुन सदर स्पर्धेत महाराष्ट्रतील २४ जिल्हानी सहभाग घेतला असुन ३९ संघाची आपला सहभाग नोंदविला होता.सदर स्पर्धेत बुलढाणा संघाची महिला संघाने दमदार कामगिरी करीत सुवर्णपदक तर पुरुष संघाचे कास्यपदक पकावित महाराष्ट्र राज्यात बुलढाणा संघाचा नावलौकीक वाढविला असुन सदर दोन्ही संघाला विजय पळसकर सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव याचे मागदर्शन व प्रशिक्षण लाभत आहेत.बुलढाणा जिल्हा महिला संघाने परभणी रायगड संघांचा धुव्वा उडवित सेमीायनलमध्ये या संघाला नमवून अतीम सामन्यात धाराशिव संघाला एकतर्फी पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले सुवर्णपदक पटकाविणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघात सृष्टी होले विनिता चौधरी सोनल खर्च भक्ती साळुंके देवश्री जगताप पलक परदेशी अदिती पाटील श्रावणी पवार संघ प्रशिक्षक राजेश्वर खगार संघव्यवस्थापक संगीता पवार यांचा समावेश होता तसेच वैयक्तिक सिगल प्रकारात विनिता चौधरी ने कास्यपदक पटकावीत महाराष्ट्र संघात आपले स्थान कायम केले असुन सदर राष्ट्रीय स्पर्धा देवास मध्यप्रदेश येथे दी १३ ते १७ जानेवारी दरम्यान सप्नन होणार आहेत.तसेच वैयक्तिक डबल्स मध्ये विनिता चौधरी व सोनल खर्चे यांनी रोप्य पदक पटकाविले तसेच पुरुषाने संघाने चंद्रपूर सांगली लातुर संघांना हरवून सेमी फायनलमध्ये यजमान जळगाव संघासोबत अटीतटीचा चुरशीच्या सामन्यात १ पॉइंटच्या फरकाने पराभव सहन करावा लागता असून बुलढाणा जिल्हा संघाला कास्यपदकावर समाधान मानावे लागले बुलढाणा पुरुष संघात विवेक जाधव शिरीष खराडे अभिषेक मानकर तनिश तायडे लोकेश चांडक मयुर सोळंके प्रसाद पाटील विजय मालोकर प्रशिक्षक कैलाश पवार संघव्यवस्थपक विजय पळसकर याचा समावेश होता.बुलढाणा जिल्हा महिला व पुरुष संघाने दैदिप्यमान कामगिरी केल्याने सॉफ्ट टेनिस असो ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष सुनील पूर्णेपात्रे सचिव रविद्र सोनावणे उपाध्यक्ष दीपक आरडे तसेच मलकापूर मतदार संघाचे आ राजेशभाऊ एकडे जिल्हा क्रीडधिकारी बाळकृष्ण महानकर साहेब सॉफ्ट टेनिस असो बुलढाणाचे अध्यक्ष संतोष बोरगांवकर कार्याध्य्ष राजेश महाजन सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असो चे बुलढाणा जिल्हा साचिव विजय पळसकर तालुका क्रिडाअधिकारी लक्ष्मीशंकर यादव राजेश्वर खगार चंद्रकांत साळुंके आदींनी खेळाडूंना शुभेच्या दिल्या असुन खुप खुप अभिनंदन केले.

सागर राऊत साहसिक न्यूज-24/सेलू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!