लोकसभा निवडणुकीच्या या दुसऱ्या टप्प्यात आज वर्धा लोकसभा क्षेत्रातही सार्वत्रिक मतदान घेण्यात आले….

0

हिंगणघाट /  विधानसभा क्षेत्रात युवकांसह महिला वृद्ध,अपंग अशा सर्व स्तरातील मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले.हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आ.समीर कुणावर यांनी आज स्थानिक जिल्हा परिषद मुलींची शाळा येथील मतदान केंद्र क्र.२०९ येथे परिवारासह मतदानाचे कर्तव्य बजाविले.त्यांची पत्नी सौ.श्रद्धा कुणावार, मुले सोहम, ओंकार तसेच स्नुषा सौ. स्वरा सोहम कुणावार इत्यादींनी मतदान केले.देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीत आपले आद्य कर्तव्य व हक्क समजून लग्नाचे उमेदवार असलेल्या नवरदेवांनीही स्वतःच्या लग्नाच्या व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ काढून आपल्या परिवारासह मतदानाचे कर्तव्य बजाविले.हिंगणघाट नजीकच्या पिंपळगाव माथनकर येथील राऊत परिवारात प्रफुल्ल राऊत यांचा आजच स.११ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नजीकच्या नंदोरी येथे विवाह संपन्न होत आहे, परंतु या उपवर युवकाने प्रथम मतदान,मगच लग्न मंडपी जाऊन बोहल्यावर चढणार, असा संकल्प केला.शेरवानी परिधान करीत डोक्याला मुंडावळ्या बांधूनच या नवऱ्या तरुणाने मतदान केंद्र गाठले.आज त्याने आपल्या परिवारातील सदस्यांसह पिंपळगाव(माथनकर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,केंद्र क्र.२७५ येथे उपस्थित होऊन मतदान केले. येथील मतदान केंद्राच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला सहकार्य केले.हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी वार्ड या प्रभागातील जगदीश वैद्य या अभियंता असलेल्या युवकाचेही आज लग्न संपन्न होत आहे. त्याने लग्नापूर्वीच मतदानाचा निर्णय घेत आपल्या नातेवाईकांसह संत तुकडोजी वार्ड येथील नेहरू शाळा मतदान केंद्रावरती मतदान केले.मतदानाप्रती जागृत असलेल्या या युवकाचा लग्नसोहळा स्थानिक कलोडे भवन मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला.तालुक्यातील फुकटा येथे युवराज हारगोडे या नवरदेवाने उस्फुर्तपणे मतदान केले. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी होऊन आपले कर्तव्य बजावावे, आवाहनही यावेळी करण्यात आले.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज /24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!