🔥वर्धा जिल्हा रोव्हर रेंजर जांबोरी करीता रवाना,दुधाली छत्तीसगड येथे आयोजन.
वर्धा,-/भारत स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय कार्यालयातर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पहिली राष्ट्रीय रोहर स्काऊट व रेंजर गाईड जांबोरी छत्तीसगड राज्यात दुधाली या ठिकाणी 9 ते 13 जानेवारी दरम्यान आयोजित केली असून यात देशभरातून 15000 युवक युवती सहभागी होणार असून वर्धा जिल्ह्यातील 50 रोव्हर रेंजर सहभागी होणार आहे.
त्यात देवळीच्या एस एस एन जे महाविद्यालयातील 17 रोव्हर्स व 20 रेंजर्स चा सहभाग आहे.
रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर, जिल्हा संघटक नितेश झाडे, जिल्हा संघटक मंजुषा जाधव, सीनियर रोव्हर लीडर रवींद्र गुजरकर व रोव्हर लीडर संतोष तुरक यांच्यासह रेंजर लीडर कल्याणी लिखार, समीक्षा नेवारे, आदर्श नाईक, मनोज नेहारे, आदित्य तामगाडगे यांचा प्रामुख्याने सहभाग आहे.
सदर राष्ट्रीय जांबोरीत पायोनियरिंग, आपत्ती व्यवस्थापन, अडथळा पार प्रशिक्षण, वॉटर स्पोर्ट्स, भव्य वृक्षारोपण, समुदाय विकास उपक्रम, ट्रेकिंग, लोकनृत्य, पथसंचलन, कलर पार्टी, बिन भांड्यांचा स्वयंपाक, युवा संसद व विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. भारत स्काऊट गाईड चळवळीच्या स्थापनेपासून गेल्या 75 वर्षात पहिल्यांदाच युवक युवतींकरिता सदर राष्ट्रीय जांबोरीचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. यात महाराष्ट्र राज्यातून अनेक जिल्ह्यातील रोव्हर स्काऊट वं रेंजर गाईड मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
राष्ट्रीय एकता, बंधुभाव, साहस, युवा कौशल्य यावर सदर जांभोरी आयोजनाचा उद्देश आहे. याकरिता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईडचे राज्य सचिव तथा सहाय्यक क्रीडा संचालक मिलिंद दीक्षित, राज्य संघटन आयुक्त अरुण सपताळे व राज्य अधीक्षक सीमा चाळके यांनी सहभागी युवक युवतींना शुभेच्छा दिल्या आहेत.