२० एप्रिल रोजी पुणे येथील ग.दि. माडगूळकर सभागृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न.
वर्धा /गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्या वतीने ऑनररी डॉक्टरेट पुरस्कार वितरण सोहळा २० एप्रिल रोजी पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.हा पदवीदान सोहळा पुणे येथील ग.दि. माडगूळकर सभागृह आकुर्डी येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व गणेश वंदनेने करण्यात आली.तसेच त्यावेळी प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक डॉ. सुनील सिंह परदेशी यांनी केले तर गांधी पीस फाउंडेशन नेपाळ या संस्थेची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लालबहादूर राणा यांनी दिली.यावेळी वर्धा येथील अनुराग गोवर्धनराव वांदिले यांना मान्यवरांच्या हस्ते ऑनररी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.अनुराग वांदिले हे आभा हेल्थ कौन्सिल चे संस्थापक असून अभिनव भारत फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.व्यावसायिकरित्या ते नवीन व्यवसायिक लोकांना व्यवसाय आणि मार्केटींगबद्दल कन्सल्ट सर्व्हिस देतात. अभिनव भारत फाउंडेशन या संस्थेद्वारे त्यांनी ग्रामीण व्यवसाय विकास आणि महिला आर्थिक सक्षमीकरण या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि व्यवसायिक कामे केलेली आहे.ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभी होऊन स्वतःचा व्यसाय सुरु करून स्वतःपरिपूर्ण आर्थिकरित्या कशी सक्षम होईल ह्या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.लवकरच ह्या विषयावर त्यांचे पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्यांच्या सामाजिक व व्यवसायिक कामाची दखल घेऊन त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.याप्रसंगी डॉ.लाल बहादुर राणा संस्थापक अध्यक्ष गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ. समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री विजयकुमार शहा, डॉ. मंगेश नेने अध्यक्ष पेण एज्युकेशन सोसायटी,डॉ. आशा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती,महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ,गांधी पीस फाउंडेशनचे प्रभारी डॉ. सुनीलसिंह परदेशी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील आलेल्या कर्तृत्वान व्यक्तींना ऑनररी डॉक्टरेट या पदवीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी हजेरी लावली.अनुराग गोवर्धनराव वांदिले यांना ऑनररी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.