वर्धा येथील महिला बालकल्याण कार्यालयात भोंगळ कारभार..

0

🔥वर्धा येथील महिला बालकल्याण कार्यालयात भोंगळ कारभार.

🔥लाभार्थी महिलेचे,पैसे सर्रास दुसऱ्याच्या खात्यात…चौकशीची मागणी

देवळी -/ वर्धा येथील महिला बालकल्याण कार्यालयामध्ये भोंगळ कारभार सुरू असून एका लाभार्थी महिलेचे लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या महिलेच्या खात्यावर अंदाजे दोन वर्षापासून बँक खात्यामध्ये जमा होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे.

            देवळी येथील एका लाभार्थी महिलेने लाडकी बहीण योजना करिता लाभ मिळावा यासाठी वर्धा येथे महिला व बालकल्याण कार्यालय मध्ये अर्ज केला होता अर्ज मंजूर झाला या अर्ज मंजुरीकरिता अर्ज भरून देणाऱ्या एका इसमाने स्वतःचा मो.नंबर टाकून या योजनेचा लाभ आपल्या नातेवाईक असलेल्या एका सख्या बहिणीस आधार नंबर लिंक करून तिचे बँक खाते लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याकरिता जोडले आहे.त्यामुळे लाभार्थी महिलेचे पैसे लाभार्थी महिलेच्या खात्यात न जमा होता परस्पर अर्ज भरून देणाऱ्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन वर्षापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहे.

               लाभार्थी महिलेला पैसे येत नसल्याकारणाने तिने चौकशी केली असता आपल्याला मिळणारे पैसे दोन वर्षापासून हिंगणघाट येथील महिलेला मिळत असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले.लाभार्थी महिलेने या संदर्भात चौकशी केली असता महिला व बालकल्याण कार्यालयातील सावळा गोंधळ चौकशीमध्ये उघड आला.

             अर्ज भरून देणारा इसम नेहमीच फसवणुकीचे काम करीत असल्याचे चर्चा असून असे अनेक प्रकार या कार्यालय मध्ये झाले असल्याचे लोकांमध्ये चर्चा सुद्धा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण संपूर्ण कागदपत्रांची कायदेशीर सखोल चौकशी करावी व झालेल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी लाभार्थी महिलेने केली आहे.(क्रमशः)

सागर झोरे साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!