वर्ध्यातील विद्यार्थ्यांनीने नदीतील कचरा काढण्याचे मॉडल केले सादर
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथील केंद्रीय विद्यालयातील नववीची विद्यार्थीनी कुमारी कृष्णा मस्के हिने नदीतून कचरा काढण्याचे अनोखे माॅडल सादर करुन विद्यालयाचा नावलौकिक वाढवला. उत्तर प्रदेशातील आयआयटी कानपूर मधील केंद्रीय विद्यालयात ११ ते १४ जुलै रोजी ५० वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन भरले होते. यावेळी केंद्रीय विद्यालय संघटनेने राष्ट्रीय स्तरावर परिषद घेतली. यात कृष्णा ने मुंबई क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले. परिषदेचा मुख्य विषय होता ‘सतत् भविष्यासाठी वैज्ञानिक नवाचार’. यात कृष्णा हिने नदीतून कचरा काढण्यासाठी नावा ( डोंगे) तयार करावेत अशी सूचना केली व सोबतच त्याचे मॉडलही सादर केले. तिच्या सादरीकरणाचे आयोजकांनी तिचे कौतुक केले. तिने याआधी विभागीय स्तर (नागपुर) व (पुणे) येथे आयोजित स्पर्धेत आपले स्थान बळकट करत राष्ट्रीय स्तरावर विद्यालयाचे नाव झळकविले. राष्ट्रीय पातळीवरील तिच्या कामगिरीबद्दल प्राचार्य संध्या निमजे यांनी तिचा गौरव केला व इतर विद्यार्थ्यांना तिच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला.