गजेंद्र डोंगरे,वर्धा /अंबानगर येथे समस्त गावाकऱ्यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला ज्ञानोदय वाचनालयाची निर्मिती करण्यात आली अगदी छोटेसे गाव असले तरी या गावातून चांगले विध्यार्थी घडावे हा संकल्प करून गावातील समस्त नागरिक बंधू भगिनी यांनी सहकार्य करून आज अंगणवाडी ची जुनी इमारत या ठिकाणी समाजाच्याया सहभागातून वाचनालयाची निर्मिती करण्यात आली अगदी सुरवातीला बाबासाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन या गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन नगराळे गौरव तामगडगे राहुल शिंगणापुरे आणि विध्यार्थी यांनी केले यावेळी पोलीस पाटील विजय कोल्हे यांनी मुलांना वाचाल तर वाचाल…..मला माणसाच्या सहवासपेक्षा पुस्तकाचा सहवास अधिक महत्वाचा वाटतो.या बाबासाहेबांच्या विचारची आठवण करून दिली.या वेळी गावातील पहिली ते पदवी पर्यंतचे सर्व विध्यार्थी हजर होते