वेळेवर एस टी बस नसल्याने बोरगाव वडाळा मार्गावरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान…..

0

🔥वेळेवर एस टी बस नसल्याने बोरगाव वडाळा मार्गावरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

आष्टी -/ तालुक्यातील बोरगाव वडाळा वर्धपूर सत्तरपुर येथील अनेक विद्यार्थी आष्टी येथे शिक्षण घेण्यासाठी जातात शाळेची सुट्टीची वेळ ही सायंकाळी पाच वाजताची आहे परंतु आष्टी वरून या वेळी एकही बस नसल्याने बोरगाव वडाळा मार्गावरील अनेक विद्यार्थी आष्टी बसस्थानकावर बसून राहतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन मानसिक त्रास सहन करावा लागतो म्हणून आर्वी किंवा तळेगाव डेपो वरून आष्टी येथुन पाच वाजता बस बोरगाव वडाळा मार्गाने यायला पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यासह पालक वर्ग करीत आहे त्यामुळे आर्वी तळेगाव आगारातील व्यवस्थापकांनी याबाबत लवकरात लवकर दखल घेऊन बस चालु करावी अशी मागणी नागरिक करीत आहे आर्वी ते वरूड मार्गे जरी बसेस सुरू राहिल्या तरी पण साहुर वरून बोरगाव वडाळा वर्धापुर सत्तरपुर जाण्याकरता बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना साहुर येथील बस स्थानकावर उभे राहावे लागते त्यातही साहुर येथील बसस्थानकावर प्रवासी निवारा नसल्याने विद्यार्थ्यांना उन्हात पावसात थंडीत उभे राहावे लागतात आणि वडाळा ही बस रात्री सात ते आठच्या दरम्यान येत असल्याने विद्यार्थ्यांना तोपर्यंत आपला वेळ बस स्थानकावरच घालावा लागतो त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतात परंतु मानसिक त्रास सुद्धा मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो त्यामुळे या गावातील सर्व विद्यार्थी पालक वैतागले असून निवेदन देवून आंदोलन करण्याच्या विचारात आहे हे विशेष

शरद वरकड साहसिक NEWS-/24 साहूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!