शिक्षक एकतेचा विजय असो…..

0

वर्धा -/ महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी दाखवलेल्या ऐक्यामुळे राज्यशासन आपल्या सर्व मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यास तयार झाले आहे. आज दुपारी शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दीपक केसरकर यांना सर्व संघटना प्रतिनिधींनी आंदोलनाची नोटीस व मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मंत्री महोदयांनी शिक्षक संघटनांनी केलेल्या विविध मागण्या संदर्भात सकारात्मकता दाखवली व तातडीने आज दुपारी साडे चार वाजता बैठक घेण्याचे मान्य केले. सध्या मुंबई येथे विविध मागण्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री यांच्या समवेत चर्चा सुरू आहे.यावेळी चर्चेदरम्यान उपस्थित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष मा. केशवराव जाधव यांचेसह इतर संघटनांचे राज्य अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित आहेत.

ब्युरो रिपोर्ट साहसिक news -24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!