🔥“संत साहित्त्य हि नैतीक संस्काराची शिदोरी”(मोहन अग्रवाल)🔥“संत गजानन महाराज ग्रंथाचे चार दिवसीय सामुहिक पारायन संपन्न”
वर्धा -/ अलीकडे आधुनिकी करणाच्या छायेखाली आणि प्रगत तंत्रज्ञाणाच्या सोबतीने उमलती पिढी जेवढी हुशार झाली तेवढीच संस्काराची आणि आपले पणाची भावना कुठेतरी त्यांच्या पासुन दुरावत चालवल्याचे लक्षात येते. महाष्ट्रात ही संताची भुमी आहे. आणि विपुल असे संत साहित्य सर्व सामान्यासाठी उपलब्ध आहे.विद्यमान परिस्थित हि संताची शिकवणुक माणसाचे भरकटले पणा सावरण्याकरिता सामर्थ्य बाळगुन आहे.आजच्या पिढीला या संत साहित्याच्या माध्यमातुन आध्यात्मिकतेचे आणि नैतिकतेचे धडे देणे ही काळाची गरज आहे.आर्थिक संपन्नेत सुख मिळतेच असे नाही मात्र मानसिक समाधानाने सुखाची प्राप्ती नक्कीच होते हे निर्विवाद सत्त्य आहे.यासाठी बालपणापासुन योग्य शिकवणुक देणे ही पालकांची,शिक्षकांची तेवढीच जबाबदारी समाजाची सुध्दा आहे.समाज प्रगल्भ असला तर राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होणे शक्य आहे.या करिता संत साहित्त्य हे संस्काराची शिदोरी आहे.त्याचा उपयोग करावा असे प्रतिपादन जेष्ट समाजसेवी व उद्योजक मोहन अग्रवाल यांनी केले.ते मगनवाडी चौक स्थित श्री संत गजानन महाराज मंदिरात आयोजित चार दिवसीय संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन नवनिर्वाचीत नगरसेवक प्रदिप तलमले,दिपीका आडेपवार संजय बमनोटे देवस्थानचे सचिव ज्ञानेश्वर पहाडे, कोषाध्यक्ष सुशिल व्यास ट्रस्टी मधुसुदन अग्रवाल आदि मंचावर उपस्थित होते.
या सामुहिक पारायणात १५५ महिला पुरुषांनी भाग घेतला. श्री हनुमान चालीसा पठन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पहाडे, यांनी केले नगरसेवक प्रदिप तलमले, दिपीका, आडेपवार यांनीही मार्गदर्शन केले. सामुहिक पारायणाचे संचालन श्रीमती सविताताई वैद्य आणि श्वेताताई पाचखेडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीते करिता अजय लांबट बाबाराव फाले, किशोर दौड, विनोद पथ्थे महाराज अनिल बाभुळकर, प्रकाश रायटर, तळवेकर गुरुजी, संजय कावले,सुरेश लांजेवार आदिनी सहकार्य केले.