समीर देशमुख यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी.
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त वर्धा जिल्हात दौरा केला अनं राजकीय वातावरणाला गती मिळाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना लोकसभा निवडणुकीचा विषय चांगलाच रंगला व त्यात भावी लोकसभेच्या निवडणुकीकरिता युवा नेतृत्व रिंगणात उभे केले पाहिजे, यावर कार्यकर्त्यांचा जोर होता. यावेळी अतुल वांदीले यांनी युवा नेते समीर देशमुख यांचे नाव सुचविले व त्यावर उपस्थित सर्व युवा, महीला आणि जेष्ठांनी टाळ्या वाजवून आपली सहमती जाहीर केली.
समीर देशमुख गेल्या १५ वर्षापासून राजकारणात सक्रिय असून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रात त्यांचे नाव आघाडीवर आहे.
या प्रसंगी सुधीर कोठारी म्हणाले की पक्षाने वर्धा लोकसभा निवडणुक लढली पाहीजे. पक्षाला मजबूत करायचे असेल तर निवडणूक लढणे गरजेचे आहे. याचा फायदा पक्ष संघटनाकरीता नक्की होईल. म्हणून युवा नेतृत्व रिंगणात उतरविले पाहिजे आणि याकरीताच समीर देशमुख यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
सध्याचे राजकीय वातावरण पाहिल्यास असे लक्षात येते की लोकसभा निवडणुकीत सर्वधर्मसमभाव तत्वावर कार्यकर्त्यांचे काम करणारा, सातत्याने समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होणारा व सर्वसामान्य नागरिकाला जवळचा वाटेल असा उमेदवार अपेक्षित असून या सर्व कसोटीत समीर देशमुख यांचे नाव चर्चेत आहे.
समीर देशमुख हे नाव महाविकास आघाडी व मित्र पक्षातील कार्यकर्त्यांना जवळून परिचित आहे. याआधी मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा समीर देशमुख यांचे नाव लोकसभा निवडणुकीकरिता अग्रस्थानी चर्चेत होते.थोडक्यात वर्धा लोकसभा मतदारसंघात युवा नेतृत्व म्हटले की त्यात समीर देशमुख हेच नाव आघाडीवर आहे. अत्यंत सालस, मनमिळाऊ व सहजपणे कार्यकर्त्यांसोबत मिसळून काम करणारे नेतृत्व म्हणून समीर देशमुख यांची एक आगळीवेगळी ओळख असून त्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे. याचा फायदा येत्या निवडणुकीत नक्कीच मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.कॅप्टन मोहन गुजरकर
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज -24