साहुर सर्कल मध्ये प्रत्येक शेतकरी रानडुक्करांचा बळी….

0

🔥साहुर सर्कल मध्ये प्रत्येक शेतकरी रानडुक्करांचा बळी.

साहुर,आष्टी -/ तालुक्यातील साहुर सर्कल मधील जंगली रानडुक्करांनी शेतातील पिके नष्ट केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे दिवसा ढवळ्या शेतात रानडुक्करे वास्तव करित असल्याने शेतातील पिके नष्ट झाली आहे प्रत्येक शेतात रानडुक्करांचा उपद्रव चालु असुन वनविभागाच्या वतीने तुटपुंजी मदत केली जाते लाखो रुपयांचे नुकसान होतात आणि हजार रुपये सुद्धा मिळत नसल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत जास्तीत जास्त शेतकरी तर भरपाई करीता अर्ज सुद्धा करीत नाही अटी आणि शर्ती अनेक असल्याने शेतकरी अर्ज सुद्धा करीत नाही वनविभागाच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहे शेतकऱ्यांची एकजूट नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे
जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिकच नाही तर मानसिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे पिकांची नासाडी पाहून शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करीत असल्याचे दिसून येत आहे दिवसभर शेतात काम करून रात्री शेतात जागरण करून पिकांचे संरक्षण करावे लागते परंतु शेतात सिंगल फेज नसल्याने अंधारात शेतकऱ्यांना रात्र काढावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांचे दिवस कधी बदलणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे हे विशेष.

 शरद वरकड साहसिक News-/24 साहूर,आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!