आष्टी शहीद / आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुसुंद्रा येथील प्रफुल बाबाराव लोणकर वय ३० वर्ष राहणार सुसुंद्रा ता. कारंजा (घा. जी. वर्धा यांनी दि.१६ एप्रिल रोजी पहाटे दरम्यान राहत्या घरी असलेल्या पंख्याला ओढणी नें गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि.१६ रोजी सकाळी ७ वाजेदारम्यान उघडकीस आली.सविस्तर असें कि,सुसुंद्रा येथील प्रफुल्ल बाबाराव लोणकर वय ३० वर्ष हा शेतमजुरी करून परिवाराचा उदर निर्वाह करित होता.त्याला पत्नी असून एक मुलगा असा त्याचा परिवार. दि.१५ एप्रिल रोजी पत्नी माहेरी गेली असताना तो जेवण करून घराच्या आत मध्ये झोपला.वडील हें अंगणात झोपले होते.हाताला काम नसल्याने तो सतत आर्थिक विवानचनेत असायचा याच नैराश्य यातून दि.१६एप्रिल रोजी पहाटे दरम्यान घरात असलेल्या सिलिंग पंख्याला ओढणी नें बांधून गळफास घेतला यात त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सकाळी सात वाजता वडील अंगणातुन घरात गेले तेव्हा त्यांना आपला मुलगा गळफास घेतलेल्या अवस्तेत आढळला. यां घटनेची माहिती पोलीस पाटील फुले यांना देण्यात आली. पोलीस पाटील यांनी पोलिसांना यां घटनेची माहिती दिली तेव्हा आष्टी पोलीस घटनास्थळी पोहचले.पोलीस कर्मचारी राजेश पाटील ,पोलिसांनी पंचनामे करून मूतदेह ताब्यात घेतला उत्तरीय तपासणी साठी आर्वी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला. यां घटनेची नोद करण्यात आली असून पुढील तपास आष्टी पोलीस करित आहॆ.