🔥सेंट थॉमस इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सायबर क्राईम,महिला सुरक्षा, व रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिविर संपन्न.
बोरगाव (मेघे) -/ सेंट थॉमस इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमिताने पुलिस विभाग वर्ध्याचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यान्च्या नेतृत्वात सायबर क्राईम, महिला सुरक्षा, व रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिविर आयोजित करण्यात आले.या शिविरात वाहतूक पुलिस निरीक्षक विलास पाटिल, रियाज खान, भरोसा सेल चे एपीआय माधुरी वाघाडे, एपीआय आशिष चीलांगे, मीना कौरती, साइबर सेल चे पिसी अंकित जीभे व माधुरी तसेच आदर्श शिक्षक मोहन मोहिते, मुख्याध्यापिका प्रीती सत्याम, शालेचे संचालक विजय सत्याम, उप मुख्याध्यापिका वर्षा देशपांडे आणी संदीप जोशी आदि मंचावर उपस्थित होते.सर्वाच्या स्वागता नंतर प्रीती सत्याम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मुलाना मार्गदर्शन दिले. रियाज खान यांनी वाहतुकीचे नियम पाळणे, हेल्मेट घालून गाडी चालवणे, नशा करून गाडी न चालवणे, सीट बेल्ट लावणे यावर त्यांनी सर सलामत तो पगडी हजार म्हणजे गाडी वारंवार मिळेल परंतु जीवन पुन्हा मिळणार नाही असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्याना दिले. अंकित जीभे यांनी आपल्या मार्गदर्शनात सायबर क्राईम वर विविध उदाहरण देऊन, फोटो अपलोड न करणे, एआय वापरताना नीट वापरणे हे आदिवर सुन्दर मार्गदर्शन दिले. माधुरी वाघाडे यांनी बाल व महिला सुरक्षा या विषयावर त्यांनी विशेष मार्गदर्शन दिले. वाहतूक नियंत्रक शाखा अधिकारी श्री विलास पाटील यांनी विशेष सविस्तर व अमुल्य गोष्ठी विद्यर्थ्याना सागीतल्या व वर्धा तर्फे पोलीस स्थापना दिना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दिनांक सहा व सात जानेवारीला पोलिस मैदना वर प्रदर्शिनि मध्ये सहभागी व्हायला सांगितले.तसेच शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले त्यात वाचन, लेखन, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सावित्री बाई फुलेंची भूमिका मनीषा बघेल नी सादर केली. कर्यक्रमाचे संचालन ऋची तिवारी यानि केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेदांत सत्याम, श्रद्धा संत, संचाली भलमे, शबाना शेख, पूजा गोसटकर, पूजा ओझा, मयुरी चव्हाण, रिजवान शेख, अपर्णा डफले, दीक्षित सर आदिनि अथक परिश्रम केले. कार्यक्रमाची सांगता करताना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर शिक्षिका चैताली बारई यांनी गाणे सादर केले.