सेलू -/ सत्य साई आराधना महोत्सव महासमाधि दिवसाचे औचित्य साधून 24-4-26 शुक्रवार ला विविध कार्यक्रमात सकाळी सात वाजता साई मूर्ती जल अभिषेक .पूजन. नंतर ओमकार साई गायत्री मंत्र. सत्य साई 108 नामावली मंत्र जप.सत्यसाईचे भजन त्यानंतर आरती विभूती प्रसाद. कार्यक्रमा प्रसंगी दु. 12 ते 4 वारकरी रेणुका माता महिला भजन मंडळ महाबळ नंतर महाप्रसाद.अन्नदान. या प्रसंगी नारायण सेवा मंडळाचे श्री गबने साहेब यांचे कडून माहेर निवास शांती वृद्धाश्रम विकास चौक सेलू नारायण सेवा देण्यात येईल. ५.३० ते ६.३० दरम्यान भाविकांना लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सत्य साई मंदिर प्रभाग नंबर 17 भगत ले आउट सेलू यांनी केले आहे.