AIISF च्या जिल्हा पातळीवर नियुक्त्या; आदिवासी विद्यार्थी चळवळीला नवी ऊर्जा सुरज आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना विस्ताराला वेग

0

🔥AIISF च्या जिल्हा पातळीवर नियुक्त्या; आदिवासी विद्यार्थी चळवळीला नवी ऊर्जा सुरज आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना विस्ताराला वेग.

वर्धा -/ विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ऑल इंडिया इंडिजिनस स्टुडेंट फेडरेशन च्या वतीने आज जिल्हास्तरावर विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
या नियुक्त्या AIISF चे विदर्भ समन्वयक सुरज आत्राम यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्षपदी योगेश रा. कुमरे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी बबलू राजू मडावी, सुमित मुकुंदराव कौरती, लक्ष्मी राजेंद्रराव उईके आणि दर्शना बाबाराव पेंदाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच सचिवपदी आचल बळवंत मडावी, सहसचिवपदी गायत्री मनोहर कंगाली, कार्याध्यक्षपदी जान्हवी राजू कौरती, संघटक म्हणून ईशांत प्रकाश कोवर व निकिता देविदास आत्राम, तर सदस्य म्हणून गौरी मोरेश्वर मडावी यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना विदर्भ समन्वयक सुरज आत्राम यांनी सांगितले की,
“विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे, शिक्षणातील अडचणी दूर करणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे. नव्या टीमच्या माध्यमातून संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल.”
या नियुक्त्यांमुळे संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अधिक सक्षम नेतृत्व तयार झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

गणेश रेंगे साहसिक News-24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!