आर्णी तालुक्यात मुरूम तस्करांचा उच्छाद; ई-क्लास जमिनीची लूट, पण तहसीलदार सुस्त की ‘मस्त’?

0

🔥हाच तो गेंडूर गिटक्या आर्नी चा मुरम व रेती चोराचा सरदार तहसीलदार वैशाख वाहुरवाघ

🔥आर्णी तालुक्यात मुरूम तस्करांचा उच्छाद; ई-क्लास जमिनीची लूट, पण तहसीलदार सुस्त की ‘मस्त’?

यवतमाळ -/ ​एकीकडे शासन महसूल वाढवण्यासाठी विविध योजना आखत असताना, दुसरीकडे आर्णी तालुक्यात मात्र महसूल विभागाच्या नाकाखाली मुरुमाची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. तालुक्यातील कोपरा शिवारात मुरुम तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करून शासनाच्या तिजोरीवर करोडो रुपयांचा दरोडा टाकला जात आहे.विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात पुराव्यानिशी तक्रारी असतानाही आर्णी तहसीलदार केवळ ‘बघ्याची’ भूमिका घेत असल्याने, या तस्करांना कोणाचे अभय आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
​’दैनिक साहसिक News -24 इम्पॅक्ट’ने या प्रकरणाचा मागोवा घेतला असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोपरा गावातील जंगल क्षेत्राबाबत उत्तर वनपरिक्षेत्राचे ACF तौर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात उत्खनन झाले नसल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती काही वेगळीच ओरडून सांगत आहे. जर वनविभागाच्या हद्दीत काही घडत नसेल, तर मग महसूल विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जमिनीचा लिलाव मांडला आहे का?
​आर्णी तहसील अंतर्गत येत असलेल्या ई-क्लास जमीन गट क्र. २८ आणि २९ मध्ये मुरुम तस्करांनी आपला मोर्चा वळवला आहे. या ठिकाणी चक्क २० फूट खोल खड्डे पाडून मुरुमाची चोरी केली जात आहे. जमिनीची एवढी मोठी चाळणी होत असताना महसूल विभागाचे तलाठी किंवा मंडळ अधिकारी झोपले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासनाचे कोट्यवधींचे नुकसान याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.
​या अवैध धंद्यात कोपरा गावातील काही ठराविक नावे समोर आली आहेत. यामध्ये:
​निलेश राऊत,​पवन वाघमारे (युवा सेना – उबाठा),​महादेव सांगडे ​यांच्या माध्यमातून रात्रंदिवस जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन आणि ट्रॅक्टरने मुरुमाची वाहतूक केली जात आहे. विशेषतः MH 29 BV 4489 या क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि MH 29 7139 क्रमांकाचा जेसीबी (जो निलेश राऊत याच्या मालकीचा असल्याचे समजते) उघडपणे या गुन्ह्यात वापरला जात आहे. एवढे स्पष्ट पुरावे आणि वाहनांचे क्रमांक समोर असतानाही कारवाई का होत नाही, हे मोठे कोडे आहे.
​कोणत्याही तालुक्याचा महसूल सांभाळण्याची जबाबदारी तहसीलदारांची असते. परंतु, आर्णी तहसीलदार या गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा करत आहेत. मुरुम तस्करांवर कारवाई न करण्यामागे तहसीलदारांना मोठा ‘आर्थिक मोबदला’ मिळत असल्याची चर्चा आता उघडपणे तालुक्यात रंगू लागली आहे. तस्करांना पाठीशी घालून स्वतःचे खिसे भरण्याचे काम प्रशासकीय स्तरावर सुरू आहे का? असा रोकठोक सवाल जनतेतून विचारला जात आहे. ​शासकीय जमिनीची लूट करणाऱ्या या ‘मुरूम माफियां’नी कोपरा गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. जर एका सामान्य माणसाने घरासाठी थोडी माती नेली, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणारे प्रशासन, या करोडोंची लूट करणाऱ्या बड्या धेंडांना अभय का देत आहे? ​आर्णीच्या तहसीलदारांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित तस्करांवर गुन्हे दाखल करावेत आणि दंड वसूल करावा, अन्यथा या भ्रष्ट कारभाराविरोधात ‘दैनिक साहसिक’News-24 लोकशाही मार्गाने आवाज उठवत राहील.(क्रमशः)

       ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 आर्णी,यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!