सोशल मीडियाचा वापर करतांना विद्यार्थ्यांनी सतर्क व अद्यावत राहणे गरचजेचे आहे,विनोद कांबळे….

0

🔥सोशल मीडियाचा वापर करतांना विद्यार्थ्यांनी सतर्क व अद्यावत राहणे गरचजेचे आहे,विनोद कांबळे.
भिडी -/ यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथे पोलीस विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांवरील शारीरिक अत्याचार व इतर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस विभागाने ‘पोलिस दीदी, काका’ या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता कार्यशाळा आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल ढांगे यांची उपस्थीती होती तर प्रमूख मार्गदर्शन म्हणून विनोद कांबळे पोलीस हवालदार व प्रफुल्ल कोडापे प्रा.अरविंद राठोड, प्रा.विश्वंभर कमठेवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विनोद कांबळे यांनी म्हंटले की, सोशल मीडियाचा वापर करतांना विद्यार्थ्यांनी सतर्क व अद्यावत राहणे गरजेचे आहे आधुनिक राहणीमान, शिक्षकांप्रती असलेला आदर, आई-वडिलांची सेवा, सोशल मीडियाचा वाढता वापर, मोबाईलमुळे वाढलेला ताणतणाव तसेच मोबाईलचा वापर करतांना दक्ष राहणे आवश्यक आहे की,प्रत्येक व्यक्तीने समाजऋण फेडले पाहिजे असे सांगून आधुनिक राहणीमान, मोबाईलमुळे वाढलेला ताणतणाव, सायबर गुन्हे, आँनलाईन फसवणूक, फेक लिंक बाबतीत सतर्क व अद्यावत राहणे अत्यंत गरजेचे आहे. असे विचार व्यक्त केले. प्रा.अरविंद राठोड यांनी मार्गदर्शन करताना म्हंटले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थि दशेत सायबर गुन्ह्यापासून दूर राहिल्याने त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि भविष्याचा विकास सुनिश्चित होइल. तसेच सतर्क राहिल्याने विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगले लक्ष केंद्रित करू शकतात, म्हणूण डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी सतर्क आणि अद्यावत राहणे अत्यंत गरजेचे आहे.. सतर्क राहिल्याने विद्यार्थ्यांवरील शारीरिक अत्याचार व इतर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस विभागाने ‘पोलिस दीदी, काका’ हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून स्थानिक पोलिस थेट शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना , सोशल मीडियाचा वाढता वापर, मोबाईलमुळे वाढलेला ताणतणाव, आजचा विदयार्थी हा उद्याचा जबाबदार नागरिक आहे, वेळेचे नियोजन योग्य प्रकारे केले तर ते कोणत्याही अनपेक्षित संकटांपासून स्वतः चे रक्षण करू शकतात. तसेच काळाच्या घडीशी अद्ययावत राहणे म्हणजे नवीन तंत्रज्ञान, ज्ञान आणि सामाजिक परिस्थिती समजून घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सतर्क राहिल्याने विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगले लक्ष केंद्रित करू शकतात. असे प्रा.अरविंद राठोड यांनी मार्गदर्शन करताना आपले विचार मांडले. संकटकाळात कुठे अन् कशी मागायची मदत?
या विषयावर प्रफुल्ल कोडापे यांनी मार्गदर्शन करताना आपले विचार मांडले
संकटकाळात विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता तत्काळ मदत मागणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मोठ्याने आवाज करणे, जवळच्या पोलिस ठाण्याला किंवा डायल ११२ वर त्वरित फोन करणे, दामिनी पथकाची मदत घेणे किंवा जवळच्या विश्वासू व्यक्ती किंवा शिक्षकांची मदत घेणे, हे महत्त्वाचे आहे. असे सांगीतले कार्यक्रमाचे संचालन प्रा राजेश जोगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विश्वंभर कमठेवाड यांनी मानले तर निलेश लाभे यांचे सहकार्य लाभले आणि शेवटीं राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

राजू वाटाणे साहसिक News-/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!