आष्टी शहीद /आष्टी तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर विद्यार्थी तहसीलच्या विविध कामाकरिता आष्टीला येत असतात . तहसील मध्य सध्याच्या परिस्थितीत स्टॅम्प मिळत नसल्याने विद्यार्थ्यासह शेतकऱ्यांचे हाल होत आहे.
सविस्तर वृत्त बँक कर्ज, आले उपयोगी विद्यार्थ्यांकरिता अशा विविध कामाकरिता शंभर रुपयांच्या स्टॅम्प गरज भासत असते मात्र गेल्या काही दिवसापासून तहसील कार्यालय आष्टी येथे स्टॅम्प उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना सुद्धा आल्या पावली परत जावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे काम होत नसल्याने आर्थिक उदंड सह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात जनशक्ती संघटना आष्टी यांनी दखल घेत तहसीलदार आष्टी यांना निवेदन देऊन त्वरित स्टॅम्प उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जनशक्ती संघटनेचे संजय जाणे, नासिर अहमद पवन गुल्हाने, आनंद निंबेकर, सचिन जयवंतकर, शेखर सपकाळ यांनी केली आहे.