स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवळीत दारूच्या अड्यावर मारला छापा
Byसाहसिक न्यूज24
देवळी / सुमित झोरे :
महापुरुषाची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात 1974 मध्ये दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला मात्र तब्बल 48 वर्ष उलटूनही ही दारूबंदी कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे देवळी तालुक्यासह शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैद्य देशी विदेशी ची सर्रास विक्री सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अशातच देवळी येथील वॉर्ड क्रं 14 येथील आय टी आय समोरील चालत असंलेली देशी विदेशी दारूच्या अड्यावर एल सी बी पथकाने छापा मारून यश कमाविले आहे.त्यावेळी 180 मिलीच्या 50 सीलबंद असलेल्या देशी दारूच्या निपा असा ऐकून पाच हजार रु मुधेमाल पकडला आहे.आरोपी राहुल दादाराव जबडे वय 31वर्ष या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यावेळी राकेश आष्टाणकर,विकास अवचट,राजेश तिवस्कर,संघसेन कांबळे यांनी ही कारवाई केली.