स्व. अशोकराव पुरोहित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लसीकरण व आरोग्य शिबीर संप्पन्न

0

प्रतिनिधी / आर्वी :

आर्वी येथील आंबेडकर वार्डातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शुभांगी भिवगडे (पुरोहित) युवती प्रमुख भाजपा वर्धा जिल्हा यांनी स्व. अशोकराव पुरोहित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरोना लसीकरण व आरोग्य शिबीराचे आयोजन केले. या शिबिराचे उद्घाटन आमदार दादाराव केचे यांनी करत शिबीरास सुरवात झाली. प्रशांत सव्वालाखे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय बाजपेयी आर्वी विधानसभा प्रमुख भाजपा, वरूण पाठक अध्यक्ष भाजयुमो वर्धा जिल्हा, प्रशांत ठाकूर गटनेते तथा नगरसेवक, अनिल जोशी अध्यक्ष मदत फाऊंडेशन, डॉ. श्यामसुंदर भुतडा, राजाभाऊ गिरधर, जगन गाठे शहर अध्यक्ष भाजपा, विनय डोळे जेष्ठ भाजपा नेते, निलेश देशमुख, उषा सोनटक्के शहर अध्यक्ष महिला आघाडी भाजपा, स्वप्नील कठाळे सदस्य महाराष्ट्र प्रदेश भाजयुमो, करिश्मा जाधव सहसंयोजीका भाजयुमो आर्वी लाभले.
आरोग्य शिबीरात कोरोना लसीकरण, नेत्ररोग तपासणी, दंत तपासणी, सुगर व रक्तदाब तपासणी इत्यादी सुज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात आले. कोरोना प्रतिकात्मक लसीकरणात २०० व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. परीसरातील अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शुभांगी पुरोहित यांनी राबवलेल्या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला.
शिबीराला प्रविण पवार उपाध्यक्ष भाजप वर्धा जिल्हा, नितिन मेश्राम, दिनेश लायचा युवा वॉरीयर्स सहसंयोजक आर्वी शहर, अंकुश मोरे, राजु कुळमेथी, विनोद डोंगरे, विक्की पवार, वैष्णवी हायगले, प्रियंका लोखंडे, साक्षी लोखंडे, समिक्षा केने, भाग्यश्री लोखंडे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!