🔥अंतोरा येथील पशुवैध्यकीय दवाखाना महिना भरापासून कुलूप बंद….माजी सरपंच देविदास पाथरे यांचा आंदोलनाचा इशारा.
आष्टी शहीद -/ आष्टी तालुक्यातील अंतोरा नवीन गावाच्या नावावर माणिकनगर ग्रामपंचायत च्या हद्दीत असलेला पशु वैध्यकीय दवाखाना गेल्या महिना भरापासून सतत कुलूप बंद अवस्तेत असल्यामुळे दवाखान्यात येणारे डॉक्टर नजरेस दिसत नसल्याने हा दवाखाना या राम भरोसे झाला आहे.
सविस्तर असे
आष्टी तालुक्यातील माणिक नगर ग्रामपंचायत च्या हद्दीत नवीन अंतोरा गावाच्या नावाने पशु वैध्यकीय दवाखाना सुरु करण्यात आला. मात्र या दवाखान्यात शेतकरी व पशु पालक आपली जाणवरे उपचारासाठी घेऊन आल्यावर या दवाखान्यात डॉक्टर शोधून दिसत नसल्याने हा दवाखाना राम भरोसे झाला आहे. दि. 23रोजी या दवाखान्यात दोन शेतकरी आपली जाणवरे घेऊन या दवाखान्यात आले तेव्हा येथे दवाखाना कुलूप बंद अवस्तेत होता. येथील माजी सरपंच देविदास पाथरे यांनी येथील दवाखाना सुरु रहावा म्हणून अनेकदा निवेदन दिले तेव्हा त्यांच्या निवेदनाला केलाची टोपली दाखविली असे सांगितले जाते. या दवाखान्यात डॉक्टर शोधून दिसत नसल्याने पशु धन मालकाची गैरसोय होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पूर्वीने गरजेचे आहे.