आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान…

0

नरेश भार्गव,आष्टी शहीद / तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी वादळी पाऊस सुरू असल्याने या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा गहू मोसंबी कांदा यासह इतर पिकांना या अवकाळी वादळी पावसाचा फटका बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.सविस्तर वृत्त असे की आष्टी तालुक्यात दिनांक 8 एप्रिल व 9 एप्रिल 2024 ला अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह तालुक्यात हजेरी लावली या मध्ये काही भागात बोरासारखी गारही पडल्याने या गारी मुळे व वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने संत्रा , मोसंबी, गहू, कांदा,उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.काही शेतकऱ्यांचा गहू सोगनीला आला असता वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अक्षरशा गहू जमिनीवर झोपून दिला. तर झाडावरील संत्रा गळून खाली पडला त्याचसोबत ज्या शेतकऱ्यांचे कांदा काढून ठेवला त्यांचे काढलेले कांदे शेतातच ओले झाले. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीची पिके मोठ्या प्रमाणात पेरली असता या ज्वारीच्या पिकांनाही या वादळी पावसाचा फटका बसल्याने ज्वारीचे पिके ही वाया जाण्याच्या मार्गावर असून भाजीपाल्यासह इतर पिकांनाही फटका बसलेला आहे. त्यासोबत या वादळी वाऱ्या ने व पावसाने काही गावातील विद्युत खांबावरील तारे तुटल्याने कोणता अनर्थ घडू नये म्हणून रात्रभर खेडे भागातील विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.अनेक जणांच्या घरावरील टिन पत्रे उडाल्याने घराचेही नुकसान झाले असल्याने यासंदर्भात महसूल विभागाने नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!