उमरखेडमध्ये सत्तेच्या सावलीत जुगाराचा ‘खेळ’; ठाणेदारांची खुर्ची धोक्यात, तर ‘विजय टायर्स’ बनले गुन्हेगारांचे सुरक्षित केंद्र!

0

🔥हाच तो सिद्धू मनवर पोलीस अधिकारी यांना लाच देवून भरवीत होता तीन पत्ती गेम.

🔥हाच तो शिद्धू चा छुपा पार्टनर नितीन वंग.

🔥हेच ते पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ एल सिबी शाखा विभागा पदाचे स्वप्न रंगवित आहे राजकीय नेते लोकाकडून

यवतमाळ -/ लोकशाहीचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २६ जानेवारीला संपूर्ण देश तिरंग्याला वंदन करत असताना, उमरखेडमध्ये मात्र ‘खाकी’ आणि ‘राजकारण’ यांच्यातील एका अजब साट्यालोट्याचा पर्दाफाश झाला आहे. ‘दै. साहसीक’ च्या विशेष शोधमोहिमेनंतर आता उमरखेड पोलीस प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, “उमरखेड ठाणेदार पांचाळ पोलीस अधिक्षक यांच्या दरबार मे हाजीर हो!” अशा स्पष्ट सूचना मिळाल्याने गुन्हेगारी जगताचे धाबे दणाणले आहेत. ​मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीनुसार, उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालणारे सर्व अवैध धंदे, विशेषतः कुप्रसिद्ध सिद्धू मनवरचा जुगार क्लब, २६ जानेवारीपासून ‘तात्पुरत्या’ स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. प्रश्न हा निर्माण होतो की, हे धंदे कायमचे बंद का झाले नाहीत? प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी हा ‘तात्पुरता’ दिखावा करण्यात आला आहे का? की वरून येणाऱ्या कारवाईच्या भीतीने ही माघार घेतली गेली आहे?
​​ज्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक (SP यवतमाळ) यांनी उमरखेडच्या ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवले आणि ठाणेदार पांचाळ यांची ‘विकेट’ घेण्याची तयारी दर्शवली, तेव्हा उमरखेडमधील तथाकथित पांढरपेशी नेत्यांचे धाबे दणाणले. २७ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास ‘विजय टायर्स’ या ठिकाणी एक गोपनीय बैठक पार पडली.
​या बैठकीचा मुख्य अजेंडा दोनच होते:
१) सिद्धू मनवरचा कोट्यवधींची उलाढाल असलेला जुगार क्लब कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ नये.
२) आपल्या मर्जीतील ठाणेदार पांचाळ यांची बदली रोखण्यासाठी यवतमाळच्या बड्या नेत्यांकडे रदबदल करणे.
​​या बैठकीचे स्वरूप इतके गंभीर होते की,यवतमाळचे काही ‘मोठे नेते’, उमरखेडमधील प्रभावशाली राजकीय नेते आणि सिद्धू मनवरचा पार्टनर नितीन बांगडू हे सर्वजण एकाच टेबलावर बसले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन भट्टू आणि नितीन बांगडू यांनी यवतमाळच्या त्या माजी लोकप्रतिनिधीची भेट घेतली, जो स्वतः ‘विजय टायर्स’ येथे नियमितपणे जुगार खेळण्यासाठी ओळखला जातो. ​साधारण अडीच तास चाललेल्या या बैठकीत पोलीस प्रशासनाचा दबाव कसा कमी करायचा आणि ‘अर्थपूर्ण’ तडजोडीतून आपला हा अवैध साम्राज्याचा गड कसा शाबूत ठेवायचा, यावर सखोल रणनीती आखण्यात आली. एका माजी लोकप्रतिनिधीने स्वतः जुगाराच्या अड्ड्यावर उपस्थित राहून अशा प्रकारे बैठका घेणे, हे उमरखेडच्या राजकीय संस्कृतीला लागलेले काळे फासणारे आहे.
​​उमरखेडच्या जनतेत आता एकच चर्चा आहे—कायदे कडक होणार की नेत्यांच्या दबावापुढे झुकणार? ठाणेदार पांचाळ यांना SP दरबारात पाचारण करण्यात आले आहे, पण ही केवळ औपचारिकता ठरेल की उमरखेडला अवैध धंद्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी घेतलेला ठोस निर्णय?
​नितीन भट्टू आणि नितीन बांगडू यांनी दुपारी १२ ते २:३० या वेळेत केलेल्या या हालचालींनी हे स्पष्ट केले आहे की, गुन्हेगारांना राजकारण्यांचे अभय आहे. ‘विजय टायर्स’ हे ठिकाण आता व्यापारासाठी कमी आणि ‘सेटलमेंट’साठी जास्त ओळखले जाऊ लागले आहे. ​एकीकडे सामान्य माणूस किरकोळ कामासाठी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवतो, तर दुसरीकडे जुगार क्लब चालवणारे आणि त्यांचे पार्टनर बड्या नेत्यांच्या सोफ्यावर बसून पोलीस बदल्यांचे निर्णय घेतात. ‘दै. साहसीक’ या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करत राहील. आता चेंडू SP यवतमाळ यांच्या कोर्टात आहे. ठाणेदारांची ‘विकेट’ पडणार की हे ‘मॅच फिक्सिंग’ यशस्वी होणार, हे येणारा काळच सांगेल.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ,वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!