🔥जि.प.प्राथमिक भिडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम 2026 मोठ्या उत्साहात साजरा.
देवळी,भिडी -/दिनांक 27 जानेवारी 2026 बुधवारला जि.प. प्राथमिक शाळा भिडी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मनोज भाऊ बोबडे होते तर उद्घाटक म्हणून श्री.सचिनभाऊ बिरे, प्रमुख पाहुणे म्हणून देवळी पं. समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनीताई नेमाडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती भिडी, लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार श्रीराज भाऊ वाटाणे, तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होते.
अध्यक्ष,उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे यांचे सर्वप्रथम कुंकूम-तिलक लावुन स्वागत करण्यात आले.त्यानंतर लेझीमच्या गजरात पाहुण्यांना स्टेजपर्यंत आणण्यात आले. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच माॅं सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.बलदेव चव्हाण यांनी प्रास्ताविक भाषण सादर केले.त्यानंतर गावातील माजी सरपंच श्री.सचिन भाऊ बिरे यांनी शाळेबद्दल आपले मत मांडले शाळेतील विविध उपक्रमांची प्रशंषा केली. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर वर्ग 1ते4 विद्यार्थ्यांच्या नाटिका, डाॅन्स, देशभक्तीपर गीत यांचे सुंदरपणे सादरीकरण झाले.
शेवटी सर्व मान्यवर व गावातील उपस्थित समस्त पालक वर्ग यांनी ‘वंदे मातरम’या गीताचे गायन करून
कार्यक्रमाचा समारोप केला.
या कार्यक्रमासाठी श्री. दुलसिंग चव्हाण सर, सौ. योगिता पावडे मॅडम,कुमारी माया मोरे मॅडम यांचे सहकार्य मिळाले.