देवळी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
देवळी : येथील स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मला व फुले अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी निर्मला दादाराव म्हणून यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर माहिती दिली भारतातील प्रथम महिला शिक्षिका होण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळतो तसेच महात्मा ज्योतिबा फुले सोबत मिळून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला यावेळी उपस्थितांमध्ये राजू कांबळे, नीलिमा मून,दीपा कांबळे,तारा गणवीर,गंगुबाई बोंडेकर,पूजा जाधव,ज्योती काकडे,नीलिमा गोडबोले,सविता भगत,कलावती फुलमाळी,सुमित्रा ताकसांडे, तसेच मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होत्या.
सागर झोरे साहसिक न्यूज/24 देवळी
