आर्वी -/अंतराळ विज्ञानाच्या जगात एक अंत्यत दुर्मिळ आणि थरारक घटना जगाच्या समोर आली आहे.खगोलशास्त्रंज्ञांनी प्रकाशाचा. वर्षाव करणाऱ्या दोन महाकाय कुष्णविवरांच्या जोडीचा शोध लावला आहेत. ही दोन्ही कुष्णविवरे एकमेकाभोवती वेगाने फिरत असुन येत्या १००वर्षाच्या आतच त्यांची एकमेकांशी भिषण टक्कर होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दशकापासून रेडिओ टेलिस्कोपच्या साहाय्याने केलेल्या सूक्ष्म निरिक्षणानंतर शास्रज्ञांनी *मार्केरियन५०१* नावाच्या एका तेजस्वी वस्तुचा सखोलपणे अभ्यास केला. सुरुवातीला यालाच *ब्लैझर* मानले. जात होते. वस्तुतः ब्लेझर म्हणजे एखाद्या आकाशगंगेचे अत्यंत तेजस्वी केन्द्र, जे साधारणपणे एका कुष्णविवरांमुळे उजळलेले असते. ही विशाल आकाशगंगा आपल्या सुर्यमालेपासुन सुमारे ५०कोटी प्रकाशवर्ष दूर आहे. परंतु ताज्या आणि अद्ययावत निरिक्षणानंतर या प्रकाशाच्या मागे लपलेला उर्जेचा एक छुपा प्रवाह(जेट)शास्त्रज्ञांना दिसून आला आहेत. यावरून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की,तिथे एक नव्हे तर दोन कुष्णविवरे आहेत, जी विलिनीकरणाच्या उंबरठ्यावर आहेत. मँक्स-प्लँक इन्स्टिट्यूट फाँर रेडिओ अँस्ट्रोनाँमी येथील प्रसिद्ध आणि प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाच्या सहलेखिका *सिल्के ब्रिटझेन* यांनी सांगितले की,या टकरीनंतर शेवटी एकच विशाल, प्रचंड मोठे कुष्णविवर शिल्लक राहिल.हे दोन्ही कुष्णविवरे ज्या प्रकारे एकमेकाभोवती नुत्य करत आहेत, हे पाहणे आपल्या साठी कुतुहलजनक आहेत. हे संशोधन २७मार्च२०२६रोजी मंथली नोटिसेस आँफ द राँयल अँस्ट्रोनाँमिकल सोसायटी या शोधपत्रिकेत नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. अर्थातच संशोधनाचे महत्त्वाचे टप्पे म्हणजे दोन उर्जा प्रवाहांचा शोध,१०रेडिओ टेलिस्कोपच्या व्हेरी लाँग बेसलाईन अँरे(VLBA)नेटवर्क मधिल ८३हून अधिक डेटासेटचा अभ्यास करण्यात आला.
विशाल वस्तुमान यातील प्रत्येक कुष्णविवरांचे वजन हे प्रामुख्याने सुर्याच्या वस्तुमानापेक्षा १०कोटी ते१अब्ज पट जास्त असल्याचा ठोस अंदाज आहे. विचित्र दिशा,सामान्यतः ब्लेझर मध्ये एकच उर्जा प्रवाह असतो, त्यामुळे येथे एक.दुसरा प्रवाह घड्याळाच्या उलट. दिशेने फिरतांना आढळला, ज्यानें संपूर्ण विश्वात संशोधकांना चकित केले आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते ही टक्कर अंतराळातील भौतिकशास्त्राचे नियम समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. जरी ही रहस्यमय घटना १००वर्षाच्या नंतरच्या काळात घडणार असली,तरीही त्याचे परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या लहरींचा अभ्यास आतापासूनच करणे सुरू झाला आहेत.. आपल्या विशाल, अनंत, महाकाय ब्रम्हांडात अनेक रहस्यमय आणि कुतुहलाने भरलेल्या नाविन्यपूर्ण आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या घटना अंतराळात रोजच घडत असतात; त्याच पाश्वभूमिवर आपल्या महाकाय ब्रम्हांडात १००वर्षानंतर दोन विशालकाय ब्लॅकहोलची समोरासमोर टक्कर होणार असल्याने, आपल्या अंतराळात काही दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहेत, असे मलाही. वाटते; त्यामुळे आपल्या देशातील संशोधकांनी या रहस्यमय घटनेचा सखोलपणे अभ्यास करून, त्या घटनेच्या परिणामाबद्दल भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना जागृत केले पाहिजे.. असे माझे. प्राजंळ मत आहे. अविनाश ल.टाके खगोलशास्त्राची आवड असणारे शिक्षक, आर्वी जि.वर्धा..
या विश्वाच्या कप्यात अनेक. दुर्लभ आणि मनमोहक घटना नित्य क्रमाने घडत असतात, परंतु विज्ञानाच्या आधुनिक शोधामुळे अनेक रहस्यमय अंतराळिय घटना आपल्याला माहिती होतात; त्यामुळे आपण या गोष्टी कडे जिज्ञासू वुत्तीने पाहायला शिकले पाहिजे. डॉक्टर शारदा महेश माथुरकर खगोलीय घटनांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासिका यवतमाळ
आपल्या ब्रम्हांडात अनेक अदभूत आणि नेत्रदीपक खगोलीय घटना घडत असतात, निसर्गाच्या या रहस्यमय घटनांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि आपल्या भारताची इस्रोच्या साहाय्याने अनेक खगोलीय घटनांचा आपल्याला अभ्यास करता येतो, त्यामुळे अंतराळाबद्दल आम्हाला जिज्ञासा आणि कुतूहल नेहमीच वाटत असते. तेव्हा विद्यार्थ्यांनीही अंतराळात घडणाऱ्या खगोलीय घटनांचा सखोलपणे अभ्यास केला पाहिजे, असे मला वाटते. सौ.ललिता उमेश आसटकर खगोल अभ्यासक आर्वी. आपल्या अथांग अंतराळाबद्दल अनेकांना जिज्ञासू पणा आणि कुतूहल निर्माण झाले आहेत. मी खगोलीय घटनांचा नेहमीच समग्र अभ्यास करुन त्याचा अध्यापनात प्रभावी वापर करून, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. करतो, अशा खगोलीय घटना आमच्या शिक्षकासाठी प्रेरणादायी ठरतात. मंगेश कोल्हे पदवीधर शिक्षक नेरी(पु)
आपल्या ब्रम्हांडात अनेक आकाशगंगा आणि ब्लॅकव्होल अस्तित्वात आहेत. आपली सुर्यमाला ब्रम्हांडातील एक छोटासा रेतीचा कण आहेत;त्यामुळे या अथांग आणि महाकाय ब्रम्हांडात अनेक नाविन्यपूर्ण शोध लागणार आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांनी या खगोलीय घटनांचा सखोल अभ्यास केला पाहिजे असे माझे प्राजंळ मत आहेत. सौ.निवेदिता नितीन वडणारे प्राचार्य विद्यानिकेत इंग्रजी स्कूल आर्वी.
या विश्वात अनेक. रहस्यमय घटना घडत असतात. आम्हाला या खगोलीय घटना दुर्मिळ वाटतं असल्या तरीही या खगोलीय घटना आम्हाला प्रेरणादायी ठरतात. आमच्या मध्ये जिज्ञासू वुत्ती वाढते. परिणामी आम्हाला अंतराळ, खगोलीय घटना यांचा अभ्यास करणे सोयीस्कर ठरते. तद्वतच विद्यार्थ्यांनीही आणि. शिक्षकांनी या घटनांचा अभ्यास करुन आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे माझे प्राजंळ मत आहेत..